STORYMIRROR

Vishal Ambhure

Others

2.5  

Vishal Ambhure

Others

@अमानुषपणाचा कहर@

@अमानुषपणाचा कहर@

1 min
477


कोरोनाच्या कहरापेक्षा माणसातील

अमानुषपणाचाच कहर इथे भारी दिसतोय ||१||


कोरोनाबद्दल कलेली टिंगलटवाळी बघताच जाणवते,

माणूस, माणूस म्हणून जगतांना माणसातील माणुसपणच गमवतांना दिसतोय ||२||


अहो या भयंकर रोगामुळे कित्येक लोकांच भविष्य आंधारमय भासतंय, 

अन् का रे माणसा तुला कोरोनाबद्दल हे अस आलतू-फालतू कसं काय रे सुचतंय||3|| 


तुझ्या असल्या वागण्यामुळे,तुझ्यातील निर्दयीपणाच रूप समाजाला प्रकर्षाने दिसतंय, 

अरे एवढेच नव्हे तर तुझ्यातील अमनुषपणाच लक्षण बघून, माणुसकीच्या मनात खूप काही खुपतंय ||४||


आज घडीला कोरोना हे जगावरील एक खूप मोठ संकट भासतंय, 

अन् कारे माणसा त्याबद्दल तुला ऊगचच काहीतरी कस रे सुचतंय ||५||


भल्या माणसा, माणुस म्हणुन एकच सांगण आहे तुला, कितीही केला कोरोनाने कहर, 

तरी तू अजून नको ओतू त्याबद्दल समाजात जहर ||६||


Rate this content
Log in