STORYMIRROR

Vishal Ambhure

Others

4  

Vishal Ambhure

Others

!बाबा!

!बाबा!

1 min
216

बाबा खरचं तुला उपमा देणारे खूप कमी मिळाले परंतु खर सांगू बाबा मला तुझ्या आयुष्याचे सारे सार कळाले.

बाबा पोटच्या पोरासाठी तू जीवनभर घामात अश्रू ढाळले.

बाबा तरी तुझ्या घामाचे मोल सगळ्यांनाच कसे नाहीरे कळाले.

बाबा तुझ्या बनेलाला पडलेली भोक, आणि तू साबनाने ओरबडलेली दाढी हे फक्त आमच्यासाठी आहे हे मात्र मला कळाले.

बाबा माझ्या आयुष्याचा मळा फुलविण्यासाठी तू काय - काय नाही रे केले.

आणि खर सांगु बाबा इथे फक्त बाकी सारे तात्पुरता आधार देणारेच मिळाले.

आणि खरचं बाबा तू ढाळलेल्या घामामुळेच माझ्या आयुष्याला विशिष्ट आकार मिळाले.

काय सांगू बाबा तुला तुच तर आहेस माझ्या नशिबाची शिदोरी, आणि संस्काराची तिजोरी.

आणि खरचं बाबा माझ्यामते तुच आहेस रे खरा संसारी.

आई तर नेहमी काटकसरच करी.

बाबा तुझ्याच रूपात मला, आयुष्यभर तोट्यात जाणारा व्यापारी देखील बघायला मिळाला.

आणि खरच रे बाबा तुझ्याच रुपात मला जिवंतपणी देव सुध्दा बघायला मिळाला.

दुर्दैव हेच आहे रे बाबा बर्‍याच जणांना तुझ्या जीवनातील धावपळीचा अर्थच नाही रे कळाला.

बाबा इथे लोकांना फक्त हेच जाणवले रे की तू कधी लंगड्याचा पाय नाही झाला,

दुधावरची साय नाही झाला,

वासराची गाय नाही झाला,

परंतु कसे सांगू रे या लोकांना कि तू लेकरांसाठी काय - काय रे नाही झाला...                


Rate this content
Log in