बदलली माणसे आता...
बदलली माणसे आता...
1 min
241
बदलली माणसे आता...
नाही आता इथे
मना मनाचा मेळ
बदलली माणसे आता
बदलली वेळ..
आपलं करता करता
कधी तुझं माझं झालं
पैशापुढं आता इथं
माणूसपण गेलं..
माणसात नाही राहिलं
आता माणूस कोणी
दोन गोष्टी आई-बाबांना
आता प्रेमानं बोलेना कोणी..
बरा होता जुना काळ
काही ती जुनी नाती
पैसा नव्हता तरीही मनापासून
ती जपत होती नाती..
सुख-दुःखात नाही आता
आपलसं कोणी
कोणाच्या खांद्यावर ठेऊ मी
आता माझ्या दुःखाचं हे ओझं..
बदलली माणसे आता
बदलली वेळ..
