बडबडगीत
बडबडगीत
1 min
152
ढगा ढगा रुसलास का?
दूर जाऊन लपलास का?
श्रावणात तुझा वेगळाच खेळ
ऊन सावलीचा रंगतो मेळ
उन्हात सगळी पिके सुकली
श्रावण सर का बरे रुसली?
काळे काळे ढग येती नभात
आनंदाचे गान फुलते मनात
पाना फुलांवर मरगळ दिसते
सर येताच गालात हसते
रिमझिम धारा आता येऊ दे
आनंदाने सारेच डोलू दे
