STORYMIRROR

Jadhav Akshay Dattatray Shashikala (PGDMF1 19-21)

Others

3  

Jadhav Akshay Dattatray Shashikala (PGDMF1 19-21)

Others

बाप!

बाप!

1 min
29

उपकाराची भाषा करू नको बाळा 

झाला बाप म्हातारा, आता छळू नको त्याला....

काया त्याने तुजसाठी झिजवली बाळा 

आता वृद्धाश्रम नको, घरच सोन्याचे कर बाळा...!


न बोलता त्याने दुःख हे आटविले 

पण सुखाच्या या दारी तुला हासवीत पाठविले....

राबून तुजसाठी, त्याने देह केला काळा

दिवसाची रात्र करून, तुज घडविले बाळा

झाला जरी तो म्हातारा, आधार दे त्याला,

झाला म्हातारा म्हणून, छळू नको त्याला.....!


कुशीत तुझ्या आता, त्याला झोपव बाळा

तुजसाठी झोप त्याने, दान केली होती बाळा,

नको हिणवूस त्याला झाला म्हातारा म्हणुनी

उद्या लेकरेही तुझी, तुला बोलवतील हिणवुनी।।


जर गेला त्याचा जीव, पोरका होशील 

अन जिवंतपणी जसे मरण अनुभवशील, 

म्हणून मायेचा हात, त्यावर फिरवशील का बाळा 

खांद्यावर बसवून, वारी घडवशील का त्याला 

झाला म्हातारा म्हणून, छळणार नाहीस ना त्याला

झाला म्हातारा म्हणून, छळणार नाहीस ना त्याला.....


Rate this content
Log in

More marathi poem from Jadhav Akshay Dattatray Shashikala (PGDMF1 19-21)