बाबा
बाबा
1 min
205
स्वप्नात हे न खरे वाटणारे
स्वप्न झाले हे पुरे
आस तुझी अन् ध्यास तुझा
सत्यात ते मी पाहिले
उतरली अशी तु मनी माझ्या
झाले मन हे बावरे
शब्द न फुटतो आज पाहता तुला
निशब्द झाली ही भावना
डोळ्यातुनी मात्र न थांबता
ओसंडून वाहतो हा झरा
कोवळी कातडी नाजूक बाहुली
आज आली माझ्या घरा
आभारी आहे मी तुझा खरा
माझीच सावली आणलीस तू माझ्या घरा.
झाले समाधान पिता प्राप्ती होऊनी
कन्यारत्न आले पोटी जन्मोनी
शतशः आभारी पुन्हा तुझे अर्धांगिनी
स्वप्नातल्या या परीला आणलीस लाखो कळा सोसुनी...
