जिवलगा
जिवलगा
1 min
222
मंद मंद सुवास चाफ्याचा
मोहून गेला प्राण माझा
हसू झाले माझेच आसू
नेत्र बनले जलधारा
विरून गेला श्वास माझा
मोह मला आज तुझा होता
कळली किंमत गेल्यावर तू
सांग आता कशी मी जगू
माफ करा आता तरी माना
परतुनी या ना आपल्या घरा
वळणावळणावर पाहते वाट
परत फिरूनी कधीतरी याल
वेळ नाही माझ्याकडे फार
संपून जाईल आज का श्वास
आजन्म मी तुमचीच राहील
पुढच्या जन्मी ही तुमचीच वाट पाहील
