STORYMIRROR

Manasi Kawle

Tragedy

3  

Manasi Kawle

Tragedy

असाच पाऊस झिम्माड…

असाच पाऊस झिम्माड…

1 min
89


असाच पाऊस झिम्माड

वाहते रस्ते गळकं झाड

पक्षी घरट्यात

माणसं बिऱ्हाडात

सगळं कसं शांत निवांत...

अंतरात... आसमंतात...


तू म्हणालास... असं वाटतंय

तू म्हणालास... असं वाटतंय

पुन्हा आठवण जगावी 

कोसळणाऱ्या पावसाची

चिमटीत धरून सोडावी 


तशीच बोट कागदाची

हातावर थेंब झेलत 

गोल गोल राणी म्हणावं

तसंच पुन्हा लहान होऊन 

गोधडी गुरफटून झोपावं

पाऊस आठवणीतला...


तुझ्या माझ्या मनातला...

झरत होता झरझर

उलगडत होतं अंतर

अचानक तू थांबलास

ओल्या पापण्यांनी हसलास


म्हणालास... म्हणाल

ास

संपला इथला सहवास

पुढचा पाऊस नसेल खास

बदलली चौकट 

की बदलेल सगळं


मनाच्या पाटीवर 

चित्र असेल वेगळं

फुटतील ढग कोसळतील सरी

सगळं नसेल तसंच तरी

सूर होतील बेसूर...


गातील राग अनवट

पावसाच्या चित्रातले...

रंग होतील फिकट

उखडलेली घरटी उजाडलेली घरं

येईल नजरेत सगळं खरंखरं

तसंच झालंय रे! तसंच झालंय...


सुरु झालाय अनवट राग

घेतोय कसला कसला माग

मी अस्वस्थ, त्रयस्थ, वैराग

सजीव चित्रातला निर्जीव भाग

सगळं जग... उदास भकास फिकट

मोडून गेलास तू चित्राची चौकट...

मोडून गेलास तू चित्राची चौकट!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy