असा कसा रे तू कोरोना?
असा कसा रे तू कोरोना?

1 min

450
असा कसा रे तू कोरोना?-२
कित्येकांची घरे जाळली,
कित्येकांची हृदये फाडली,
कित्येकांची फुफ्फुसे वाळली,
कित्येकांची जीवे काढली।
असा कसा रे तू कोरोना?
लग्नांचे सिझन गेले,
लोकांचे व्हिजन गेले,
जगण्याचे रिझन गेले,
जनतेचे जीवन गेले।
असा कसा रे तू कोरोना?
चीन, इटली, स्पेन, अमेरिका,
या महासत्तांना तू धूळ चाखली,
इराण, ब्रिटन, फ्रान्स, भारत,
या भूमी ही तुझ्या क्रोधाने माखली।
असा कसा रे तू कोरोना?
आता तरी सोड आम्हाला,
विराम दे तू या रडण्याला,
नवी दिशा दे या जगण्याला,
मुक्त कर आता, या विश्वाला।