अमृत
अमृत
शिंपाडून अमृत हे पुन्हा मी पवित्र झालो,
सगळी मिटली पापे आणि मी पुण्य झालो.
पाहीली एक गोरी गोमटी,
असावी कुणाची लेक बहीण ती,
अर्ध उघड्या मांड्यांवर लक्ष,
उरोजांवर देऊन कटाक्ष.
लचके तिच्या देहाचे,
मी ही घेतले मनामध्ये,
बलात्काराची बातमी वाचत,
बलात्कार करत राहीलो.
तिलाच मानून वेश्या मी,
स्वतःचा ही दलाल झालो,
डोळ्यांत माप कंबरेचं,
नितंब कुरवाळत राहीलो.
शर्म तिच्या नजरेतली,
दिसली तरी पुसली मी,
बेशर्म होऊन आक्रोश मुका,
ऐकत राहीलो मी ऐकत राहीलो.
घेऊन क्षण तो घरात शिरलो,
मदमस्त होऊन घरभर फिरलो,
ताठलेला अभिमान माझा,
आंजरत गोंजारत राहीलो.
आला मग तो एक क्षण,
शिंपाडले देहअमृत मी,
विझली होती भूक आता,
होतो शांत निवांत मी.
पापी होतो आताच मी,
लागलीच पुण्यवान झालो,
पापी रोजच लाखो मर्द,
नामर्द मी ही सामील झालो.
कित्येक असेच बलात्कार,
पाहीले ऐकले होते आजवर,
ऐकून कैफियत मैत्रिणीची गणेश,
सैतान होतो माणूस झालो.
शिंपाडून अमृत हे पुन्हा मी पवित्र झालो,
सगळी मिटली पापे आणि मी पुण्य झालो.
