आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात


कळले मला जे तुला न कळले
मनातले ते मनातच अडले
शब्द ही सारे अपुरे पडले
स्वप्नांचे सारे पाणी पाणी झाले
सहवासाचे दोरे सुटून गेले
आयुष्याचे रंग फिके पडले
दुर्मिळ क्षणांचे जाळे विणले गेले
त्यातून बाहेर निघणे अशक्य झाले
मनास सांगे, बस्स आता पुरे झाले
स्वप्नांनी ही वेगळे वळण घेतले
क्षणभर थांबून रडून घेतले
आता फक्त हसायचेच ठरवले