STORYMIRROR

Rupal Patil

Others

3  

Rupal Patil

Others

आठवणीतलं फूल

आठवणीतलं फूल

1 min
49

होते ते तुटले

तुटताना ते पाहिले

पाहिलेले ते आठवते

आठवले की डबडबते

डबडबलेले डोळे हलकेच पुसते

पुसता पुसता गहिवरते

गहिवरून हिरमुसते

हिरमुसलेल्या चेहऱ्याने

पुन्हा आठवणीत रमते 

आठवणींच्या रिंगणात उणीव त्याची भासते

नजरेला नजर भिडण्याची वाट पाहते

गोल गोल फिरून पुन्हा तिथेच येते

नजर माझी त्याच्याच शोधात फिरते

तो जवळ असण्याची चाहूल सारखी लागत असते

त्याच्या आठवणीतलं फूल रोज माझ्या ओंजळीत येऊन पडते


Rate this content
Log in