आयुष्याच्या सहवासात
आयुष्याच्या सहवासात

1 min

19
लाभले छान आई-वडील
आयुष्याच्या सहवासात!
त्यांच्यामुळे यश मिळते
जीवनाच्या प्रवासात!
कोणतीच नाही काळजी
आई-वडील असल्यामुळे!
आयुष्य आहे छान
सहवास यांचा लाभल्यामुळे!
माझ धैर्य आहे खूप मोठं
ते मला गाठायच आहे!
चूकणार तर नाही मी
याचीच भीती वाटत आहे!
आयुष्यात समोर जाऊन
मला काहीतरी बनायचं!
शिक्षिका बनणे हे माझ स्वप्न
साकार मला करायचं!
भीती आहे मनात माझ्या
जिद्द पण आहे मोठी!
धन्य माझी आई ती
मी जन्म घेतला तिच्या पोटी!
आयुष्याचा सहवास आहे
माझ्यासाठी जीवनाचा सार!
सोबतीला आहे आई-वडील
मला त्यांचाच आहे आधार!
विश्वास आहे स्वतःवर माझा
मी काहीतरी नक्कीच करणार!
किती हि संकटे आली वाटेला
पण कधी हार नाही मानणार!
आई वडील मिळाले चांगले
माझ्याकडे सगळचं समावलं!
आयुष्याच्या सहवासात
मी खूप ज्ञान कमावलं!