STORYMIRROR

Minakshi Marotkar

Others

4  

Minakshi Marotkar

Others

आयुष्याच्या सहवासात

आयुष्याच्या सहवासात

1 min
50

मिळाले छान आई-वडील

आयुष्याच्या सहवासात!

त्यामुळे रात्र होताच

झोप लागते निवांत!


कोणतीच नाही काळजी

आई-वडील असल्यामुळे!

आयुष्य आहे छान 

सहवास यांचा लाभल्यामुळे!


ध्यैर्य आहे खूप मोठं

ते मला गाठायचं!

चूकणार तर नाही मी

याचंच भेव वाटायचं!


आयुष्यात समोर जाऊन

मला काहीतरी बनायचं!

शिक्षिका बनणे हे माझ स्वप्न

साकार मला करायचं!


भीती आहे मनात माझ्या 

जिद्द पण आहे मोठी!

धन्य माझी आई ती

मी जन्म घेतला तिच्या पोटी!


आयुष्याचा सहवास आहे

माझ्यासाठी जीवनाचा सार!

सोबतीला आहे आई-वडील

मला त्यांचाच आहे आधार!


विश्वास आहे स्वतःवर माझा

मी काहीतरी नक्कीच करणार!

किती हि संकटे आली वाटेला

पण कधी हार नाही मानणार!


आई वडील मिळाले चांगले

माझ्याकडे सगळचं समावलं!

आयुष्याच्या सहवासात 

मी खूप ज्ञान कमावलं!



Rate this content
Log in