STORYMIRROR

Shubham Nikam

Others

3  

Shubham Nikam

Others

आरती कुलस्वामिनी यमाई (एकवीरा) देवीची.

आरती कुलस्वामिनी यमाई (एकवीरा) देवीची.

1 min
151


श्री आदिकौमारी उदयोस्तु


जयदेवी जय देवी यमाईमाते।

स्वसुतासमरक्षी तू निज भक्तांते ॥ धृ॥ जय देवी जय देवी


दक्षिण काशी राजा केदारनाथ ।

अठरा पद्म भैरव सोबति सैन्य ।

अवध्य असूर एक नामही औंध।

समरी त्याचे पुढती सर्वांना दैन्य।।

जोतिबा मग समरी हाक दे स्फूर्ति।

मुखोद्गत तै नाम धरीले यमाई ||१||


श्लोक सप्तशति तुजलाचि स्तविती ।

 मार्तण्डासम जाज्वल शोभे तव मूर्ती ।

अगणित नामे रूपे एकवीरा सगळी । 

त्र्यंबिका रणदुर्गा मयुरारूढ झाली ।

हाक मारता सत्वर यावी अनुभूति। 

ऐशा दे भक्तीसी, मग नाही भीती ||२||


दत्त हृदयी तुजवीण अन्य नसे ध्यान।

स्कंद पुराणी वदले ऋषी-मुनी-जन।

 जग कल्याणी स्वयंभू अवतरसि नित्य |

'अनाथासी माय' ब्रीद तुझे सत्य।

अल्पमती मी पामर न जाणे महती ।

मी तान्हुले बाळ तुझे नि तू वत्सल आई ॥३॥


जमदग्नीनी रामा दिधले वरदान। 

जननी प्राप्त पुन्हा होईल म्हणून!

ती तू माहूर वासिनी मूळपीठावर | 

आकेश पद्मभूषणे नटली सुंदर।

युगांतरीचा विरह घडवी मिलन। 

शिववीण नसे शक्ती, शक्तीविण शिव ||४||


सौख्य कानन वासिनी देवी अपर्णे । 

श्रीपति पूजिते राघव सुखधाम्ने ।

काव्यशास्त्रादिक मजसी ना ठावे । 

वीर स्नेह विरह रसपूर्ण भावे ।

तरिही यत्न केला जननी तुजसाठी । 

आश्रय दयावा आम्हा, दुर्लक्षून त्रुटी ||५||


साहित्याला गुण द्या
लॉग इन