आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय
ऐकुनी व्यभिचाराची कथा
वैभव तुम्हाला एक प्रश्न विचारतोय
खर सांगा मावळ्यांनो
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय?
एकट्या दुकट्या परस्त्रीला पाहताना
तोल तुमचा का घसरतो़य
न राहुन तुम्हाला विचारतो.
खरं सांगा पोरांनो
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय?
माझ्या या शिवबाच्या देशात
भ्रष्टाचार का पसरतोय
ऑफिसात राजाचा फोटो असतानासुद्धा
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय?
गल्लीबोळात न चौकाचौकात
रांझ्याचा पाटील डोळे विस्फारतोय
पण आम्हाला काय हो त्याच
आम्ही तर शिवबाची शिकवण विसरतो़य
जयंती , मिरवणुकीतही आता
राजांचा आवाज दुमदुमतोय
राजाच्या जयंतीलाच कायदा मोडुन
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय
वाचायचा शिवाजी आम्ही आता
रोजरोज डोक्यावर घेउन नाचवतोय
सैराट होउन बेभान होताना
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय
विसरलेला शिवाजी आठवताना
वैभवचा जीव तळमळतोय
ओरडुन विचाराव वाटंत जगाला
का आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय?
वाचुन न घेता जय गाजवल्याने
बराचसा गैरसमज पसरतोय
आमच्या अडाणीपणामुळेच
आम्ही शिवबाची शिकवण विसरतोय
पुन्हा पुन्हा तळमळुन तुमच्यापुढे
हा वैभव हात पसरतोय
ज्याला पुजतो, वंदितो
त्या शिवबाची आम्ही शिकवण विसरतोय
