STORYMIRROR

जागर शिवविचारांचा

Others

4  

जागर शिवविचारांचा

Others

म्हणून मला प्रेमच करायचं नाही

म्हणून मला प्रेमच करायचं नाही

1 min
431

जेव्हा सुरू होतं पोरांचं सुरू १६ वर्ष वय...

अन् आई वडिलांना वाटू लागतं भय....

आई वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाचा आता मला चुराडा करायचा नाही....

तुझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या तुझ्या भावासोबत मला राडा करायचा नाही...

तुझी जात वेगळी माझी जात वेगळी म्हणून ह्या जातीयवादी गावाचा मला डळमळीत गावगाडा करायचा नाही....

म्हणून मला प्रेम करायच नाही....


तुझ्यामागे वेड्यासारखं कामधंदा सोडून मला फिरायच नाही....

तुझ्या आठवणीत तहानभूक विसरुनी मला झुरायच नाही..

म्हणून म्हणून मला प्रेम च करायचंच नाही....

काय होईल जर प्रेमात मी पडलो तर....

काय होईल तुझ्या साठी मी इथे तिथे रडलो तर...

तुझ्या प्रेमात जर पडलो तर खिशाच वाडेल ओझं...

महिन्याच बजेट एका दिवसात संपेल माझं.....

इथे तिथे तुझ्या शॉपिंगसाठी उधारी करून लाचार मला ठरायचं नाही...

म्हणून मला प्रेमच करायचं नाही.....


तुझ्या प्रेमात पडलो.... तर वाढतील माझ्या तुझ्या कॉलेज बाहेर चकरा....

ब्युटी पार्लर.,nail paint, अजून काय काय सहन करावा लागेल तुझा नखरा..

मी जर बोललो makeup वर

तू येशील ब्रेक अप वर...

मी propose केलं तर तू oppose करणार...

अन् तुझं "सैराट" प्रेम माझ्यातल्या परशाचा शेवटी गेमच करणार....

तू लाख म्हणशील म्हणशील ग 

"तू ही रे माझा मितवा"

पण तू थोडीच सांगणार मी नेमका कितवा...

तुझ्या यादीतला मला माझा नंबर च पाहायचा नाही....

म्हणून म्हणून मला प्रेमच करायच नाही....


तुझ्यावर प्रेम केलं तर आई वडिलांच्या प्रेमाला मुकाव लागेल....

माझ्या माय बापाला विसरुनी तुझ्या माय बापापुढे झुका व लागेल....

माझ्या माय बापा शिवाय इतर कुणापुढे मला झुकायचंच नाही...

म्हणून मला प्रेम करायचच नाही


Rate this content
Log in