आम्हांला सोडून...
आम्हांला सोडून...
1 min
249
आम्हांला सोडून तू गेलास
मागे आठवणींच गाठोड ठेवुन
तुझ्या हट्टापायी तु ओढावलस
अन मागे सगळ्यांना रडवलसं ।। १।।
प्रत्येक फोटोत तू दिसतोस
मात्र गप्प गप्प राहतोस
आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना
अश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।। २।।
तुझ्या अशा अवचित जाण्याने
जगाचं खरच काय गेलं
तुझ्या घरातल्या माणसाच जीवन
मात्र दुष्काळी रान झालं ।। ३।।
तुझ्या आठवणीने मन माझं
शोकसागरात सुन्न झालं
मनात दडवलेल्या शब्दांना जणु
मी आज मोकळ केलं ।। ४।।
