STORYMIRROR

Prasanna Koppar

Others

3  

Prasanna Koppar

Others

आमची मुंबई

आमची मुंबई

2 mins
223

आमची मुंबई

सपनो की नागरी म्हणवणारी

दिवसा लोकांनी तर रात्री प्रकशांनी जगमगणारी

धर्म जात लिंग वर्ण न बघता प्रत्येकाला आपलं मूल बनवणारी

आमची मुंबई, मुंबई जी ची माई

आमची मुंबई


सकाळी चार वाजता ही जिथे ट्रेन मध्ये गर्दी असते

जिथे गरीब स्टेशन वर गाऊन जगतो तर श्रीमंत ताज मध्ये खाऊन जगतो

जिथे मध्यम वर्गीय राइस प्लेट खाऊन जगतो, जिथे प्रत्येक व्यक्ती आवडीने वडापाव खाऊन जगतो

ती आहे आमची मुंबई


 ०७:०८ ची दादर फास्ट जिथे ७-८ पक्वांनांपेक्षा आकर्षक वाटते

जिथे कोणी सीट साठी भांडतो तर कोणी डोर साठी मरतो

बाहेरच्याला "अंदर चलो" म्हणत सुरुवात करून आत्मधल्याला "उतरके चढो" म्हणत जिथे प्रवास संपतो

जिथे कोणी गर्दीत बॅग वाजवत "रूप पाहता लोचनी" म्हणतो तर कोणी पत्ते खेळत प्रवास करतो

ती आमची मुंबई


जिथे "कालची मॅच बघितली का" म्हणून काम सुरू करून, 'चल रे पक्या एक कटिंग मारून येऊ" म्हणून ब्रेक घेतला जातो

पावसाळ्यात भजी खाऊन जिथे आनंद लुटला जातो, चेहरा ही न बघता जिथे पावसाळ्यात छत्रीचा आसरा दिला जातो

अनोळखी व्यक्तीला जिथे "तो ब्रिज बंद आहे, तिकडून जा लवकर पोहोचशील" सांगतात तर कधी "बसा तुम्हाला सोडतो" म्हणत लोकांचा वेळ(जीव) वाचवतात

ती आमची मुंबई


घाम गाळून घरी जाताना सुद्धा ६:०५ ची डोंबिवली पकडायला लोक पी टी उषा सारखे धावतात

कितीही थकलेले असले तरी  "ताई तुम्ही बसा" म्हणत जागेवरून उठतात 

सकाळी जितका उत्साह होता तितक्याच उत्साहाने रात्री ८ वाजता ही "रूप पाहता लोचनि" म्हणतात

उद्या ७:०८ ची दादर मिळेल ना विचार करत लोक झोपायला जातात


ही माय सगळ्यांवर माय बरसावते

माणसाला गरिबापासून श्रीमंत बनवते

जिथे एके काळी डोंबिवलीत राहणारा वरळी ला घर घेतो

जिथे एके काळी डोर वर लटकणारा BMW घेतो

जिथे "आई मी येतो" म्हणत माणूस अमेरिकेला उड्डाण भरतो

ती आमची मुंबई

आमची मुंबई


Rate this content
Log in