आली असते पण काय करू..
आली असते पण काय करू..
आली असते पण काय करू..मिळत नाही रजा...?
काढ तो तोंडाला बांधलेला स्कार्फ...
ते हेडफोन...बंद कर ते पॉप सॉंग,
ती व्हाट्सएप - फेसबुकवरची चॅटींग...
अन बंद कर मित्रांसोबत
कँटीनमधली चहा कटींग...
लेक्चर कर, अभ्यास कर...
आईला कामात थोडी मदत कर..
बाबांचा पेन्शनचा फॉर्म भर...
भावाला कुठे कुठे अडलेली गणितं सोडव...
आजारी आजीला निदान गोधडी ओढव...
कुणाजवळ हातपाय पसरू नकोस कधी...
अन कोपर्डीचं प्रकरण विसरू नकोस कधी..
कुणी केलाच जर हळुच पाठीत वार...
सोडू नको त्याला निदान दोन
फटके तरी मार...
पोरी खेळायचं वय तुझं खेळत जा खेळ ...
अंधार पडल्यावर पाळत जा घरी लवकर जायची वेळ...
धावपळीचं जीवन झालंय जणू
चौपाटीची भेळ...
मोबाईलने हिरावून घेतला
आपल्यातलाच मेळ...
आल्या गेल्यानचं स्वागत कर...
आपल्यांची काळजी कर...
दिवस भर भर उडून जातील
एके दिवशी तू पण घर सोडुन दूर जाईल...
घरात तुझ्या आठवणींच्या काचा काचा होईल...
तुझ्या संसाराचा प्रवास लोकल सारखा सुरु होईल...
ते म्हणतील महागाई खूप झाली...
तू जॉब करून थोडा हातभार लाव...
सकाळची धावपळ ..म्हणून बाहेर खाऊ वडापाव...
तू गेल्यावर घर उठेल आम्हांलाच खायला..
परकं परकं वाटेल तुझ्याकडेच यायला... कधी कधी
बघ तुला ठसका लागेल ..मग आमची आठवण येईल...
तेंव्हा तूच म्हणशील..
आली असते पण काय करू..मिळत नाही रजा...?
आली असते पण काय करू..मिळत नाही रजा...?
