STORYMIRROR

Pavan Kamble

Others

4  

Pavan Kamble

Others

आज शेवटचं भेटायचंय तिला...

आज शेवटचं भेटायचंय तिला...

1 min
428

उद्या लग्न आहे तीच म्हणून आज

शेवटचं भेटायचंय तिला

मनात माझ्या आयुष्यभरासाठी

जपायचंय तिला..


जास्त नाही पण थोडं बोलायचंय तिला

व्यथा माझ्या मानतील

आज सांगायचंय तिला..


उद्या जाईल ती तिच्या दिलेल्या घरी पण

जाताना कायमचं परकं

मला करील ती पुन्हा...


हळवं मन हे माझं खूप रडेल ग उद्या

अश्रू माझ्या डोळ्यातील

सांडले ती उद्या..


भेटल्याक्षणी मिठीत माझ्या भरीन मी तिला

काही क्षणासाठी कुशीत तिच्या

झोपेन मी जरा..


या मावळत्या सुर्यासोबत आमचं

प्रेमही इथेच मावळलं

ती माझ्यापासून दूर जाता क्षणी

मनातही माझ्या कालवलं..


मी दिलेल्या नवारी साडीत

आज शेवटचं पाहायचंय तिला

दुरून फोटो काढून माझ्या हृदयाचा

वॉलपेपर सेट करायचंय तिला..


दिल्या घरी तू सदैव सुखी रहा

बस एवढच सांगायचंय तिला

आज शेवटचं भेटायचंय तिला...


Rate this content
Log in