STORYMIRROR

Yogita Pakhale

Others

2  

Yogita Pakhale

Others

आईची महती

आईची महती

1 min
3.8K


 

आई आई आई खरेच काय असते

स्वता आई झाल्यावर आई कळते

 

आईच्या मायेची कशी वर्णावी महती

आईच्या कुशीपेक्षा नाही काही किमती

 

प्रेम तिचे असते जगात न आलेल्या बाळावरही

लेकरांसाठी लढत असते जगाशी देऊन सर्वकाही

 

आई असते खचलेल्या जीवाचा आधार

मुलांच्या स्वप्नांसाठी नाही तिची माघार

 

सर्व प्रेमाचे रस्ते बंद होतात तेव्हा एकच रस्ता उरतो

अन् आईच्या सदैव उघड्या हृदयात नकळत शिरतो

 

आई असते यशाचा कळस अन् यशाचा पाया

तिच्या चरणस्पर्शाशिवाय मात्र हा जन्म वाया

 

संधी शोधतं प्रत्येक नातं प्रेम व्यक्त करायला

गरज नाही भासत आईला प्रेमाचा पुरावा द्यायला

 

नतमस्तक झाला देवही आई निर्माण करून

मोह त्याला ही न आवरला तिच्या पोटी जन्म घेऊन

 


Rate this content
Log in