आई
आई
1 min
12K
आई म्हणून एकेरी
पालकत्व निभावतांना
एकल पालक म्हणून
जगाशी झुंज देत आहे
अपरिहार्य कारणांमुळे
स्वबळावर सांभाळतांना
परिस्थिती सोबतचा संघर्ष
अविरत सुरू आहे
आयुष्याच्या वाटेवर
पाठबळ नसतांना
संसारात तारेवरची
कसरत सुरू आहे
समाजाच्या वाईट नजरा
प्रसंगांना तोंड देतांना
दुनियेत मानाने जगण्याची
धडपड करीत आहे
मातृत्वाच्या नात्याची
नाळ जपतांना आई म्हणून
स्वावलंबी जीवन जगण्याचा
अभिमान आहे
