STORYMIRROR

Sagar Gangurde

Others

3  

Sagar Gangurde

Others

आई

आई

1 min
215

लाख यातना जन्मावेळी

परी हसूच तुझ्या ओठांवरती,

मी आलो अन् 'आई' झाली

माझ्यासाठी तू तुलाच विसरली।।


पहिला शब्द, पहिलं पाऊल

सगळं 'पहिलं' तूच शिकवलं,

गिरवलेल्या चित्राला बघितलेल्या स्वप्नाला

रंगवायलाही तूच शिकवलं।।


असा कसा जीव

गुंतला तुझा माझा,

माझी भूक तुझी झाली

अन् तुझा घास माझा।।


ठेच माझ्या पायी लागे

अश्रू तुझ्या नयनी दाटे,

मन उदास माझे होई

अन् घोर तुझ्या जीवा लागे।।


प्रश्न सुटेना उत्तर मिळेना

प्रेमाच्या तुझ्या गूढ न उमजले,

डोळे मिटले प्रेम चिंतले

अन् प्रतिबिंब हे तुझे उमटले।।


तुझे रूप अजूनच खुलते

ओलावती आनंदाने डोळे तुझे,

त्या अश्रूंच्या एकेक थेंबासाठी

आता हे जगणे माझे।।


Rate this content
Log in