जखम
जखम
1 min
203
व्हावी एखादी किळसवाणी जखम
स्वतःच्याच चुकीमुळे स्वतःच्याच मनाला ।
काहूर माजावं वेदनांचं आतल्या आत असे
ओघळही न दिसावे कोरड्या आसवांचे कुणाला ।।
डोळे न भिडे आता स्वतःच्याच डोळ्यांशी
आरशानेच मागावे पुरावे चांगुलपणाचे ।
हृदयाची घालमेल अशी मनी उफाळली
स्वतःच्या पायावर घातले घाव स्वतः कुऱ्हाडीचे।।