आई
आई
1 min
213
आई तू माझी आई
तुझ्याविना नाही माझ्या जवळी काही
भान नसते जेव्हा मला
तेव्हा आई माझ्या जवळी असते
दुःखातही फक्त आसरा जिचा
अशी आई माझ्या श्वासात बसते
थकून, हारुन जेव्हा मी घरी येई
तिच्या मायेच्या कुशीत ती मला भरूनी घेई
घेऊनी मायेत जेव्हा ती
हात माझ्या डोक्यावरती फेरी
डोळे तिचे अश्रूंच्या पानात भरूनी जाई
तिला आई म्हणु की माय
मां म्हणू की माॅम
माझी आई आहे माझा अभिमान
जिच्यात बसले माझे प्रेमाचे स्थान
माझ्या हसण्यात जिचे हसणे
माझ्या जगात तिचे जगणे
जिच्याविना नाही माझ्या जवळी काही
स्वर्गाचे दुसरे नाव आहे माझी आई
माझी आई तु फक्त आई नाही
माझे जीवन ए गं
माझ्या सुखाचे तू सुख आणि
दुःखाचे तू हरण ए गं
माझी आई तू माझी आई
जिच्याविना नाही माझ्या जवळी काही
