आई
आई

1 min

24K
तिच्या जिव्हाळ्यात सप्तरंगी
रंगात मिसळणारं प्रतीक असतं
आईचं प्रेम कधीच खोटं नसतं
तिच्या डोळ्यात अश्रू असले तरी
सर्वांना सांभाळणारं हृदय असतं
आईचं प्रेम कधीच खोटं नसतं
तिच्या साथीला कुणीच नसलं तरी
निर्मळ आनंद देण्याचं शृंगार असतं
आईचं प्रेम कधीच खोटं नसतं
तिच्या भावनेत खळखळणारं
मुक्त असं निस्वार्थ पाणी असतं
आईचं प्रेम कधीच खोटं नसतं