STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

4  

Hemlata Meshram

Others

आई

आई

1 min
487

आई म्हणून एकेरी

पालकत्व निभवतांना

ऐकल पालक म्हणून

जगाशी झुंज देत आहे


अपरिहार्य कारणांमुळे स्वबळावर

बाळाला सांभाळतांना परिस्थिती

सोबतचा संघर्ष अविरत सुरु आहे


आयुष्याच्या वाटेवर कुठलेही

पाठबळ नसतांना संसारात

तारेवरची कसरत सुरु आहे


समाजात बऱ्या वाईट नजरा

प्रसंगांना तोंड देतांना

समाजात मानाने जगण्याची

केविलवाणी धडपड करीत आहे


मातृत्वाच्या नात्याची

नाळ जपतांना आई म्हणून स्वावलंबी

जीवन जगण्याचा अभिमान आहे


Rate this content
Log in