आई म्हणजे
आई म्हणजे
1 min
506
आई सशाचं काळीज
आई सिंहाची हो छाती
आई डोक्यावरचं आभाळ
आई पायाखालची माती.
आई काळजाचा हुंकार
आई मनातला झंकार
ईश्वराच्या आधी आई
आई म्हणजेच ओंकार
आई लेकराचे पंख
आई वैऱ्याचे डंख
आई मायेने श्रीमंत
आई नसते हो रंक .
आई अत्तराचा फाया
आई सुखाची वाकळ
आई भरीव दिलासा
नाही कधीच पोकळ.
आई काळोखी उजेड
आई दिव्यामध्ये वात
आई असते हो धर्म
आई नसते हो जात.
