Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Shendge

Others

3  

Vijay Shendge

Others

आरक्षण

आरक्षण

1 min
659



​विठ्ठलाच्या पंढरीत

​रांगेमध्ये उभे जन

​त्यात कुणी म्हणे देवा

​आम्हा हवे आरक्षण.

​दलितांची रांग देवा

​कर आता वेगळी रे

​भटक्यांची दुसऱ्यात

​उभी कर सगळी रे

​रांगेविना भट सांग

​आत कसे गेले सारे

​मराठ्यांनी कुठे काय

​सांग घोडे मारले रे.

​परंपरा थोर जरी

​कुळ जरी आहे थोर

​आता वाटे जग सारे

​झाले आहे शिरजोर.

​देव म्हणे भक्ता सांग

​मला कुठे आरक्षण

​कृष्णा हाती होते जरी

​मला कुठे सुदर्शन.

​स्वर्गामधे सांग मला

​कधी कुठे पाहिले रे

​दीन दुबळ्यांचे दुःख

​मीच सारे साहिले रे.

​आरक्षण मिळालेला

​कोण सांग झाला मोठा

​भीक नको मागू कधी

​कर्तृत्वाच्या शोध वाटा.


Rate this content
Log in