आई झाल्यानंतर...*
आई झाल्यानंतर...*
1 min
263
आई झाल्यानंतर समजत
आईचं प्रेम नेमकं काय असत...
पोटच्या गोळ्यासाठी जेंव्हा डोळ्यातून अश्रू
वाहू लागतात
तेंव्हा आईच्या अश्रूंची किंमत कळू लागते..
भुकेनं जेंव्हा मुलं व्याकुळ होऊन
रडू लागतं
मग छातीला धरून दूध पाजताना
आईच्या मायेची ती ममता कळू लागते..
मूल माझं नजरेपासून एक क्षण
कधी दूर झालं तर
काळीज माझं वर-खाली होतं
आईला सोडून सासरी मी जाताना माझ्या
आईच्या काळजाची होणारी ही जाणीव
मला आई झाल्यानंतर झाली..
आई झाल्यानंतर जिला आपली आई कळते
तिचं खरी आई असते.. तिचं खरी आई असते....
