इतके लेखक आहेत आणि ठिगभर साहित्य... तरीही मी का लिहावं ? माहीत नाही ? लहान असल्यापासून या लेखकांचा माझ्या जीवनात जरा जास्तच हस्तक्षेप... अगदी पहिल्या इयत्तेतचं "बबन कमळ बघ..." इथून सुरवात. पुढे अजून प्रगति झाली आणि हे सगळे लेखक थेट माझ्या घरातच आले. अहो म्हणजे, साने गुरुजींची श्यामची आई, पु. ल.... Read more
इतके लेखक आहेत आणि ठिगभर साहित्य... तरीही मी का लिहावं ? माहीत नाही ? लहान असल्यापासून या लेखकांचा माझ्या जीवनात जरा जास्तच हस्तक्षेप... अगदी पहिल्या इयत्तेतचं "बबन कमळ बघ..." इथून सुरवात. पुढे अजून प्रगति झाली आणि हे सगळे लेखक थेट माझ्या घरातच आले. अहो म्हणजे, साने गुरुजींची श्यामची आई, पु. ल. नंची बटाट्याची चाळ, राम गणेश गडकरींचा विसरभोळा गोकुळ, कुसुमावतींचा दमडी इ. थेट गद्य स्वरूपात पुस्तकात अवतरले... आणि मग हे लेखक माझ्या आजूबाजूला वावरू लागले. आपोआपच पाय ग्रंथालयात वळले. ययाती, वपूर्झा, मृत्युंजय इ. बरीच पुस्तक वाचली. आजही सू. शी. चं लिखाण मला प्रेरणा देत. जाई कादंबरी कासावीस करते त्यातून आपणही लिहू शकतो का? हा प्रश्न आला... या सगळ्या थोर लेखकांची बरोबरी करण्याची माझी पात्रता नाही. पण एक आवड आणि काहीतरी भन्नाट सुचत म्हणून पानावर ओढते... तुमचे अभिप्राय काहीतरी नवीन शिकवतील हीच प्रेमळ अपेक्षा... Read less