STORYMIRROR

#Lockdown Life Lessons

SEE WINNERS

Share with friends

गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान आपल्यापैकी अनेकांचे स्वतःबद्दलच्याच अज्ञात पैलुंकडे लक्ष गेले असेल, यात आश्चर्य नाही. या काळात आपले आयुष्य 360 अंशाच्या कोनात वळल्याचेही आपण पाहिले आणि याच काळाने आपल्याला वर्तमानाचा आनंद उपभोगण्यास, आपल्या आवडी-निवडींना वेळ देण्यास, निसर्गाशी जोडून घेण्यास आणि एकत्रित जीवन जगण्याचे मूल्य शिकवले.


आयुष्यात अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे तुमच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचेही तुम्ही अनुभवत असाल, जसे की-


लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीचे आणि आताचे आपण, अशा दोन्ही व्यक्ती समानच आहेत का? आपण कोण आहोत, या प्रश्नाच्या उत्तरात काय बदल झाला आणि तुम्ही जगाकडे आता कशा पद्धतीने पाहता? आपण कसा संघर्ष केला, स्वतःत कसा बदल केला आणि विलगतेच्या या काळात तुमची सर्वांगीण वाढ कशी झाली?


आम्ही अशाच प्रेरणादायक कथांच्या शोधात आहोत, ज्या आम्हाला, तुम्ही या काळात कसे एखादे कौशल्य आत्मसात केले, नवीन आवडी-निवडी जोपासल्या, एखादी नवीन पाककृती शिकली किंवा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन बदलण्यासाठी या काळाची कशी मदत झाली, हे सांगतील.


स्टोरी मिररने या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनमध्ये काय शिकलात? ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेमध्ये आपल्याला लॉकडाऊनदरम्यान आलेले अनुभव, अडी-अडचणी, महत्त्वाचे क्षण, प्रसंग, घटना आणि भावनिक ताण-तणाव यांसारख्या आव्हानांवर कसा विजय मिळवला, या विषयांवर लिहिता येईल.


नियम :

शैलीचे बंधन नाही नाहीत.

संपादकीय गुण आणि वाचकांना खिळवून ठेवण्याच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

सहभागींनी आपले स्वतःचे मूळ साहित्य सादर करावे. आपण सबमिट केलेल्या साहित्याच्या संख्येस मर्यादा नाही.

शब्द मर्यादा नाही.


साहित्य प्रकार :

- कथा


- कविता


- ऑडिओ


भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये साहित्य सादर केले जाऊ शकते.


पुरस्कार :

सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

काही उत्कृष्ट आणि प्रेरणादायक कथा स्टोरी मिररच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित केल्या जाती.


पात्रता :

साहित्य सबमिट करण्याचा कालावधी : दि. 21 जुलै 2020 ते 21 ऑगस्ट 2020


स्पर्धेचा निकाल : सप्टेंबर 2020


Trending content
30 628