#Haunted

PARTICIPATE

Share with friends

मनुष्यांतील सर्वात जुनी आणि प्रभावी भावना म्हणजेच भीती आणि सर्वात प्राचीन व जोरकस भीती म्हणजे अज्ञाताची भीती!

- लेखक एच. पी. लव्हक्राफ्ट


आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी भुताटकीचा अनुभव घेतला असेल वा अमानवी घटनांचा सामना केला असेल किंवा काही जणांना केवळ भीतीचा शहारा अनुभवता यावा म्हणूनही भयकथा आवडत असतील.


भयानक झोंबी किंवा सुराधारी लाकुडतोड्या, सैतानी ताकदीचे मूल किंवा अदृश्य व्यक्ती, अशा दाणदाण पावले टाकणार्‍या, सपासप वार करणार्‍या भुतांना, राक्षसांना पाहण्याव्यतिरिक्त आपले रक्त सळसळवणारे दुसरे काहीही असू शकत नाही. असे हे भयानक अंधारे साम्राज्य आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिता? आम्हाला माहिती आहे.


स्टोरी मिरर हाँटेड नावाने भयकथा लेखन स्पर्धा सादर करत असून तिथे तुम्ही तुमच्या प्रतिभाशक्तीच्या, शब्दांच्या माध्यमातून वाचकांच्या मनात खर्‍याखुर्‍या भीती, रहस्य आणि दहशतीची भावना निर्माण करु शकता.


आम्ही अगदी थरारक, अंगावर काटा येईल, अशा भयकथांच्या शोधात आहोत!


आपल्या भयकथेत तुम्ही पुढील शब्द वापरु शकता :

भयकथा, भूतकथा, भयानक, अमानवी घटना, भयानक कथा, भयानक चेहरा, भीतीदायक चेहरा, भयानक भूत, भयानकआपल्या भयपट कथेत वापरण्यासाठी शब्द :

भयपट कथा, भूत कथा, भयपट, अलौकिक क्रियाकलाप, भयानक कथा, भयानक चेहरा, भयपट चेहरा, भयानक भूत, भयानक घटना, ड्रॅकुलाची भीती, अमानवी, झपाटलेल्या डोंगरावरील घर.


आपण आपल्या कथेत वरीलपैकी सर्व किंवा किमान 5 शब्द वापरू शकता.


नियम :

भयकथा असणे आवश्यक

संपादकीय गुणांच्या आदारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

सहभागींनी आपली मूळ रचना सादर करावी. आपण कितीही रचना सादर करु शकता, त्याला मर्यादा नाही.

शब्दसंख्येस मर्यादा नाही.

वर दिलेल्या यादीपैकी किमान 5 शब्द आपल्या कथेमध्ये वापरणे आवश्यक


साहित्य प्रकार :

कथा


भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये रचना सादर केली जाऊ शकते.

 

बक्षिसे :


उत्कृष्ट 20 कथा स्टोरी मिररद्वारे ईबुक रुपात प्रकाशित केल्या जातील.


रचना सादर करण्याचा कालावधी :

11 सप्टेंबर 2020 ते 26 ऑक्टोबर 2020


निकाल :

नोव्हेंबर 2020


संपर्क:

ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर: +91 9372458287