#52 Weeks Writing Challenge Edition 4

PARTICIPATE

Share with friends

परिचय

लिखाण धडकी भरवणारे आहे. इतर लोक लेखकाकडून कलात्मक सुस्पष्टतेची, व्याकरणाच्या नियमांची आणि अनोखेपणाची अपेक्षा करतात. तुम्ही कल्पनेच्या अगदी लहानात लहान बिंदूपासून प्रारंभ करता, परंतु तीच कल्पना भाषेमध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यात तुम्ही जीव ओतत असल्याचे वाटते.

स्टोरी मिरर आपणा सर्वांना 52 आठवडे लेखन आव्हान - 2021 (संस्करण 4) च्या चौथ्या हंगामात भाग घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. ही स्पर्धा आपले लेखन कौशल्य पुढच्या पातळीवर नेईल आणि आपल्या सर्जनशील शक्तीस बळकटी प्रदान करेल.

तुमच्या मनात ठरवलेले लेखक व्हा!

नियम :

१. सहभागी लेखकांना ५२ आठवडे सलग ५२ कथा किंवा ५२ कविता सादर करणे आवश्यक आहे. अर्थात प्रत्येक आठवड्याला एक साहित्य रचना (कथा अथवा कविता.)

२. उदाहरणादाखल, आपण जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून स्पर्धेत आपली साहित्य रचना सादर केल्यास, आपल्याला जानेवारी २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत साहित्य रचना सादर करू शकता.

३. सहभागी लेखक वेगवेगळ्या लेखन प्रकारासाठी (कथा/कविता) नोंदणी करू शकतात. तथापि, ५२ साहित्य रचनांचा संच कथा किंवा कविता अशा दोन्ही प्रकारात असावा.

४. लेखकांनी सादर स्पर्धेत सहभागी होऊन साहित्य रचना सादर करण्यास सुरुवात केल्यास व मध्ये कधीही साहित्य रचना सादर करणे थांबवू नये. लेखकाने असे केल्यास त्यांना अपात्र घोषित केले जाईल. 

५. सादर लेखन आव्हान स्पर्धा तीन लहान टप्प्यात विभागलेली आहे -

- १३ आठवड्यांचा लेखन टप्पा

- २६ आठवड्यांचा लेखन टप्पा

- ३९ आठवड्यांचा लेखन टप्पा

संबंधित टप्पा पूर्ण करा आणि त्यातील फायदे मिळावा.

६. विजेत्यांचा निर्णय साहित्य रचनेच्या एकूण वाचन संख्या आणि वाचक पसंती तसेच संपादकीय गुणांचा आधारे घेतला जाईल. सर्व ५२ साहित्य रचनांची एकत्रित गुणांकन असेल.

७. स्टोरीमिररचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल. 

८. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

बक्षीस -

१. प्रत्येक भाषेतील २ (१ कथा + १ कविता) विजेत्यांना ट्रॉफी प्रदान केली जाईल तसेच स्टोरीमिररच्या ब्लॉगमध्ये स्थान दिले जाईल 

२. १३ आठवड्यांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र (१/४ लेखन प्रवास) दिले जाईल. 

३. २६ आठवड्यांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच लेखन प्रवासातील १/२ भागानंतर रु. १०० किंमतीचे स्टोरीमिरर शॉप व्हाऊचर मिळेल.

४. ३९ आठवड्यांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच लेखन प्रवासातील ३/४ भागानंतर रु. २०० किमतीचे स्टोरीमिरर शॉप व्हाऊचर मिळेल. 

५. ५२ आठवडे सलग लेखन केल्यानंतर स्टोरीमिररद्वारे आपल्या साहित्य रचनेचे ई-बुक प्रकाशित केले जाईल + प्रमाणपत्र दिले जाईल. 

भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये आपली साहित्य राचा सादर करता येईल.

टीप : आपण एकापेक्षा अधिक भाषांमध्ये साहित्य रचना सादर करत असल्यास आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये ५२ स्वतंत्नत्र साहित्य रचना सादर करण्याची आवश्यकता आहे.

पात्रता :

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी - १ जानेवारी २०२१ ते १५ एप्रिल २०२२ पर्यंत. 

३० एप्रिल २०२१ पर्यंत नोंदणी करता येऊ शकते

निकाल - जून २०२२