गर्भातील पवित्रता
गर्भातील पवित्रता
1 min
495
जिच्या गर्भात
गाभाऱ्याची पवित्रता मिळते,
त्या पवित्रतेपुढे नतमस्तक होऊ या...
जिच्या धैर्याने
ह्या जगात पदार्पण करतो,
त्या धैर्याला वंदन करू या...
जिच्या वात्सल्यामुळे
आयुष्याची ओळख पटते,
त्या वात्सल्याचा अंगीकार करु या...
जिच्या प्रेमामुळे
नात्यांची ओळख पटते,
त्या तन्मयतेला आपलंसं करु या...
जिच्या उदात्ततेमुळे
वाईटातूनही चांगले घडते,
त्या उदारतेला आत्मसात करू या...
संकटांचे डोंगर धीराने
पार करणाऱ्या
त्या सहनशीलतेचा अभ्यास करू या...
फक्त आजचाच दिवस तिचा नाही, हे लक्षात घ्या,
जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात तिच्या अढळ स्थानाचा
सत्कार करू या...