STORYMIRROR

Ashwini Kothawale

Others

3  

Ashwini Kothawale

Others

राष्ट्रप्रेम

राष्ट्रप्रेम

1 min
183

राष्ट्रभक्ती तनामनात भिनलीमातृभूमी ही या हृदयात अवतरली

बंधुप्रेम, समता यांचे धडे गिरवले

भारत भूमीला माय म्हणून मिरवले


राष्ट्रप्रेम, स्वतंत्रता व निर्भयता मनात उमगली

अभिमान बाळगला जी कायमच मनात वसली

प्रेम वात्सल्य ममतेचं रूप ही मातृभूमी

जन्म घेतला जिच्या पोटी तीच जन्मभूमी


आदरणीय असे सदैव ही आमचीच कर्मभूमी

जपला मान, सन्मान, अभिमान अशी ही भारत भूमी

बहुरंगी, बहुढंगी कलावंत असे हे विविध वेशात

विविधतेत एकता वसलेली असे या भारत देशात


स्वातंत्र्याच्या काळात जपला बंधुभाव एकता

वेश वेगळा तरी सगळ्यांसाठी एकच न्यायदेवता

आदर्श घेतला परी थोर बहुजनांचा

भारत देश असे हा शूरवीरांचा..


Rate this content
Log in