Swati Damle

Others

2  

Swati Damle

Others

'व्हॅलेंनटाईन '

'व्हॅलेंनटाईन '

6 mins
1.3K


लंच टाईम संपत आल्याने घाईघाईने मी ऑफिस कडे चालले होते. माझे अर्धे लक्ष घड्याळाकडे होते. मनाशी काही विचार करीतच मी मैदान ओलांडीत होते. अचानक लांबून कोणीतरी धावत येते आहे असे मला हे आता पुढे सांग ना हे झाल आता इथे जायचं ना कॉपी करायला दिसले. काय झाले ते समजत नव्हते. घोळका जवळ जवळ येत होता. मनातून मी घाबरले होते. पण तसे न दाखवता मी तिथेच उभी राहिले. सर्वात पुढे धावणारी व्यक्ती हाडकुळी, दाढीधारी अशी होती. फार धावल्याने त्याला धाप लागली होती व वारंवार आकाशाकडे नजर ठेवून तोंडाने काही पुटपुटत होती. माझ्या पुढील एक जण दुसऱ्याला म्हणत होता, कोई पागल लगता है! धावणारी व्यक्ती आता माझ्या अधिक जवळ आली. मी परत परत निरखून पाहिले. अरे! नकळत माझ्या तोंडून आश्चर्योद्गार निघाला. ते आमच्याच सेक्शन मधील देशपांडे होते. तेथे वेड्यासारखे ते असे का पळत असावेत असा क्षणभर विचार आला. आणि मी पुढे होऊन त्यांना अडविले. देशपांडे! अहो काय झाले काय? माझा चेक हो ,मॅडम, माझा चेक! काय? मी परत विचारले व ते पाहात असलेल्या दिशेकडे पाहू लागले. जवळच्याच सिग्नलच्या खांबावर एक कबूतर तोंडात कागद घेऊन बसले होते.

बोटाने निर्देश करीत देशपांडे धापा टाकत सांगू लागले. हे, हे बघा, पार्टी चा चेक घेऊन पळालंय! इतर बघे आता सरसावले. कोण? कोण तो चोर? त्या गर्दीतून मी देशपांडे ना बाहेर काढले व ऑफिस मध्ये घेऊन आले. जरा कॉफी पिताच ते शांत झाले. त्यांना मी म्हटले, असे काय वेड्यासारखे धावलात त्या कबुतरा मागे? आकाशात पळणाऱ्या बरोबर पायी चालणाऱ्याची स्पर्धा होईल का? चेक गेला खरं. पण असं त्याच्या मागे पळून एक्सीडेंट झाला असता म्हणजे? तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. मी साक्ष देईन वेळ पडल्यास! आत्तापर्यंत चेक कबुतराने नेल्याची गोष्ट कर्णोपकर्णी झाली होती. ऑफिस मधील एक एक माणूस त्याचे सांत्वन करायला येऊन गेले. हे असे घडले तरी कसे? असे ऑफिसरने विचारताच देशपांडेचा चेहरा पडला. रडकुंडीला येऊन ते म्हणाले, मी माझं काम करीत बसलो होतो. अचानक समोरच्या खिडकीतून कबूतर आल आणि जोरात वाराही आला. वाऱ्याने नुकतेच येऊन पडलेले चेक उडू नयेत म्हणून मी पेपरवेट काढायला ड्रॉवर उघडला. एवढ्यात एक वरचाच चेक उडाला तो त्या बेट्याने पकडला व उडून गेला! मी क्षणभर बघतच राहिलो. पण माझ्या मेंदूपर्यंत चेक गेल्याची संवेदना पोहोचताच मी तसाच धावत सुटलो. की कुठेतरी हे कबूतर चेक खाली टाकेल. पण नाही! आता काय करावं समजत नाही. मी चेक घेतलेला नाही , चोरला नाही. पण मी हे सिद्ध कसं करू? देशपांडे अतिशय निराश झाले होते. साहेबांना कितीही खरे वाटत असले तरी महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून त्यांना वर कळवण भागच होतं. प्यार करता करता देशपांडेची मूर्तीच माझ्यासमोर उभी राहिली. अगदी साधी राहणी, हसतमुख चेहरा, आणि आपण बरं की आपलं काम बरं अशी वृत्ती! इतिहास भूगोल अगदी पक्का! शिवाजी संभाजी च नव्हे तर अकबर, औरंगजेब ही पाठ! आर्य भारतात कुठून आले, कसे आले हे त्यांना विचारा! श्री गणेश कुठून कुठ पर्यंत पोहोचले त्यांना विचारा! प्लासीची लढाई, पानिपतची लढाई, डुप्ले, इंग्रज, फ्रेंच, ईस्ट इंडिया कंपनी, साऱ्यांचे संदर्भ त्यांचे पाठ! कुठल्याही ऐतिहासिक प्रश्नाला उत्तर तयार! दांडगी मेमरी! जी गोष्ट इतिहासाची तीच भूगोलाची! पृथ्वी गोल आहे. ती कशी हे ते आम्हाला अशा थाटात सांगतात की जणू त्यांनीच तो शोध लावला आहे. जगातील एखादे ठिकाण सापडत नसेल तर खुशाल त्यांना विचारावे, नुसते ते कुठे कुठल्या देशात आहे एवढेच सांगून ते थांबणार नाहीत तर त्याचा आगापिछा सांगून मोकळे होतील. डोळे मिटूनही तुम्ही ते ठिकाण नकाशावर सुद्धा शोधून काढू शकाल. पण इतिहास भूगोलात हरवलेला हा माणूस जगताना मात्र सदा सर्वकाळ वर्तमानात असायचा! 2 दिवसापूर्वी बायकोशी झालेला संवादही ते कसा तंतोतंत सांगत की जणू ते आत्ताच आपल्यापुढे बायकोशी बोलत आहेत. त्या सांगण्यात चेहऱ्यावरील हावभाव व हात वारे असतातच! त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असे काहीतरी आहे की ते बोलले की हसू येते. एक दिवस ते ऑफिसात आले नाहीत तर आम्हाला चुकल्याचुकल्यासारखे वाटते. साधारणतः हा त्यांचा आवडीचा शब्द तर देन? हा परवलीचा शब्द! अशा या हसऱ्या, सदा प्रसन्न, खेळकर स्वभावाच्या माणसावर आज हा असा प्रसंग येऊन ठाकला होता. वाईट वाटत होतं ते हे की अतिशय प्रामाणिक असलेला माणूस स्वतःची चूक नसताना केवळ दुर्दैवाने शंकाकुशंकांच्या मोहोळात अडकला होता. ऑफिसमध्येही त्यांच्याविषयी जेव्हा कुजबुज ऐकू आली तेव्हा मला रागच आला. या लोकांना दुसऱ्यांच्या मर्मावर बोट ठेवताना जराही विचार कसा करावासा वाटत नाही? दुसऱ्यासाठी कधी त्याने पैसा खर्च केला नसेलही पण दुसऱ्याचा घेतलाही नाही. मग त्याच्यावर हा खार का? कसला सूड उगवत आहेत ही माणसे? त्याला चोर, लफंगा ठरवून कधीच मोकळे झालेत हे लोक. हाच प्रसंग त्यांच्यापैकी एकावर आला असता म्हणजे? या गोष्टीला एक आठवडा लोटला, चौकशी समिती नेमण्यात आली. क्या समितीपुढे जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा कार्यक्रम पार पडला. मला स्वतःला तरी वाटत होते की माझी साक्ष झाली की हा कलंक नक्की नाहीसा होईल. कारण मी त्या कबुतराला तोंडात चेक असताना पाहिले होते व देशपांडे लाही घामाघूम होत त्याच्यामागून धावताना पाहिले होते. माझ्या दृष्टिकोनातून हा सरळ मामला होता. पण त्याचे गांभीर्य मला चौकशी समितीने विचारलेल्या प्रश्नांवरून कळून चुकले. मी ते कबूतर पाहिले म्हणताच त्यांनी मला प्रश्न केला, देशपांडे म्हणतात तेच ते कबूतर हे तुम्ही कसे सिद्ध कराल? मी यावर निरुत्तर झाले. दुसरा प्रश्न म्हणजे, त्याच्या तोंडातील कागदाचे चिटोरे म्हणजे चेकच होता असे तुम्हाला वाटते काय? तरी बरे आमच्या साहेबाने ही कबुतरे वारंवार येऊन आम्हाला त्रास देतात एवढे तरी सांगितले. शिवाय त्यांना काहीतरी प्रतिबंध झालाच पाहिजे असेही त्यांनी प्रतिपादन केले. पण त्यामुळे कदाचित पुढचे प्रसंग टळले असते. पण आज, आत्ता या परिस्थितीपुढे उपाय काय? संपूर्ण शरणागती शिवाय गत्यंतर नाही काय? आणि संपूर्ण शरणागती म्हणजे तरी काय? न घेतलेल्या पैशांसाठी कलंक बाळगायचा वा पैसे भरायचे का? माझ्या मनाला ही गोष्ट अर्थातच पटत नव्हती. काय उपाय शोधायचा? यासाठी मी युनियन लीडर कडे धाव घेतली. पण ही गोष्टच अशी घडली होती की आज पर्यंतच्या युनियनच्या रेकॉर्डमध्ये असा कोणताही प्रकार झालेला नव्हता. या गोष्टीसाठी संप, मोर्चे ही हत्यारे बोथट झाली होती. सर्व लीडर विचारमग्न झाले होते. चौकशी समितीचे काम संपले. उद्या निकाल जाहीर होणार होता. आम्ही मान खाली घालून बसलो होतो. आमचाच एक सहकारी विनाकारण या प्रकारात दोशी ठरतोय म्हंटल्यावर विलक्षण अपराधाची जाणीव आमच्या मनाला होत होती. देशपांडेही डोक्याला हात लावून विमनस्कपणे बसला होता. एखादा मेमो मिळण्या व्यतिरिक्त आणखी काही होईल असं वाटत नव्हतं! पण तरीही अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्य दक्षतेने काम करूनही निष्काळजी ,बेफिकीरीचा येणारा आरोप सहन करण्याचे सामर्थ्य देशपांडेच्या स्वच्छ ,नितळ मनात नव्हते आणि तेही खरेच होते! दुपारी चार वाजले. गुटुर गु! गुटुरगु! एक सारखा आवाज घुमू लागला. खिडकीवरील मोकळ्या जागेत एक कबुतरांचे जोडपे जोरजोरात घुमत होते. आपल्याच नादात! आपल्याच तालात! माझी तंद्री भंग पावली आणि माझ्या डोक्यात तिडीक उठली. हीच ती कबूतर! यांच्या पायी च हा प्रसंग आला. मी तिरीमिरीने बाहेर जाऊन शिपायाला बोलावून आणले. हाकलून दे पहिले यांना! असे म्हणून मी स्वतः त्यांना दात ओठ खात हाकलू लागले. शिपायाने खिडकीवर चढून त्यांना हाकलले. आणि तेथील अस्ताव्यस्त कागदपत्रे नीट ठेवू लागला आणि एकदम हर्षभराने, मॅडम !हे पहा! असे म्हणून टुणकन खाली उतरला. त्याच्या हातात एक चेक होता. तो हातात घेऊन देशपांडे पुढे गेले व जोराने म्हणाले, देशपांडे, उठा! आज 14 फेब्रुवारी! व्हॅलेंटाईन डे ना! म्हणूनच तुमच्या व्हॅलेंटाईन कडून तुम्हाला सप्रेम भेट आली आहे पहा. त्यावर देशपांडे म्हणाले, काय मॅडम चेष्टा करता? अरे, चेष्टा नाही, हा घ्या तुमचा हरवलेला चेक! चेक पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू त्या चेक वर सांडत होते. कृतज्ञतेने त्याने बाहेर असलेल्या कबुतराकडे पाहिले. इतक्यात त्याच्या भावना जणू कळल्या आहेत असे सांगणारा गूटरगु आवाज परत एकदा घुमला आणि आम्ही सारेच हसू लागलो.


Rate this content
Log in