तिसरी
तिसरी
सुहास आणि माधवी यांना तब्बल बारा वर्षानंतर जाई जुई या जुळ्या मुली झाल्यात, दोघही दिसायला खुपचं सुंदर होत्या म्हणून लाडही त्यांचे तेव्हढेच कौतुकाने व्हायचे आणि काळजीही तितकीचं घेतली जायची.नवसाच्या मुली म्हटल्यावर तर अगदी राजेशाही थटाच ना! दोघांनाही लाडाकोडात वाढवले मोठ केले.सार काही त्याच्या मना सारखचं व्हायचं.आता पाच वर्ष झाले म्हट्यावर जाई जुईला एक भाऊ असावा या अपेक्षेत असताना सुहास माधवीच्या आयुष्यात पुंन्हा तिसरी मुलगीचं आली आणि सर्वांच मनं नाराज झाले. विचार केला काय आणि झाले काय,पण हि तिसरी कन्या दिसायला छान जरी असली तरी मात्र जाईजुई ईतकी सुंदर नव्हती.सावळा,रंग सडपातळ. खरतर सुहास माधवी दोघही रंगाने गोरे असताना या तिसरीचा रंग सावळा कसा हा सर्वांना न उमजणारा प्रश्न होता.न उमजणारा काय कोड्यात टाकणाराच प्रश्न होता ना,किंवा काहीतरी वैद्यकिय किरण असावं असो.पण काय आलेया भोगाशी असावे साधन,या उक्तीप्रमाणे नकारार्थीपणे तिसरीला लहानाच मोठ केले.रंग सावळा झाला म्हणून काय पोटच्या पोराला एव्हढ हिणवावं ते ही आई वडिलांनी? ए काय गं,ऐ हे कर गं,ए ते कर गं, बसं दिवसभर राबराब काम काम, दया माया तर मुळीच नाही.आमची तिसरी अशी आमची तिसरी असचं काहीतरी मधवीच बोलनं असायचं नावं म्हणून तिला काहीच नाही,लाडकोड तर दुरचं पण खाण्यापिण्याच्या बाबतितही ती दुर्लक्षीत असायची, खेळायला नको म्हणू की टिव्ही बघायला प्रत्येकवेळी तिला नाकार असायचा. जवळ कोणी घेतही नव्हते आणि तिच्याशी कोणी निट बोलतही नव्हते ,ती बिचारी आपलं घरातले कामे उरकवून एकटिचं किचनमध्ये जावून बसायची झोपायचीही तिथेच,सर्वांच जेवण झालावर मग ती शेवटी एकटी जेवायची.प्रेम तर कोणाकडुनही तिला मिळतही नव्हते कपडेलत्ते खाण्याची हौसमौज तर फक्त जाई जुईच व्हायचीं.
शेजारी रहाणारे शाम काकांना मात्र तिसरीचे हाल बघवतं नव्हते तेचं तिला छकुली म्हणून होकरत असे आणि सुहास माधवीची नजर चुकवून तिला काहीना काही खायला देत असे, तिची काळजी घ्यायचे कधी कधी गपचूप घरी घेवून काकी तिला काहीना तिला पोटभर जेवायला द्यायची काकी कडून तिचे लाड व्हायचे प्रेमाची उब मिळाल्याने जणू तिचं मन गहीवरून यायचं,पोटची पोरगी असतानाही सुहास माधवी कडुन तिसरीला मोलकरीण सारखी वागणूक मिळायची. जाईजुच यथासांग शिक्षण झालं दोघांच लग्नही थाटामाटात झालं दोघीही चांगल्या घरात गेल्यातं, त्यानंतर जाईजुई दोघींना मुलं झालीतर तरीही या तिसरीच्या लग्नाचा विचार होत नव्हता.
एकदा शाम काकांनी सहज विषय काढला तर,कोण करेल हिच्याशी लग्न काळी सावळी आणि कशाला हिच्या लग्नाला खर्च करायचा नाहीतरी घरात कोणीतरी एकजन कामाला लागतोचं अस सुहास माधवी कडून तिरस्कार्थी उत्तर मिळ्यावर तर शाम काकांची बोलतीच बंद झाली. ईतकाही कठोरपणा उभ्या आयुष्यात शामकाकांनी पाहिला नव्हता,आणि पोटच्या पोरी बद्दल सख्या आई वडीलांचे असे विचार असावेत यावरतर शामकाका नी् काकीचा विश्वास बसत नव्हता.पण म्हणतातना ज्याचा कोणी नसतो त्याचा परमेश्वर असतो आणि दोन जिवांच्या ऋणानुबंधच्या गाठी कुठेना कुठेतरी लिहलेल्या असतातचं.तेव्हा काहीजरी झाल तरी तिसरीचं लग्न करून सुहास माधवीच्या जाचातून बाहेर काठायचं शामकाकांनी ठरवलं आणि त्या प्रमाणे ते कामालाही लागले.
शामकाकांच्या ऑफिसच्या बाहेर नोकरी नाही म्हणून मेस चालवणारा बीएस्सी बीएड झालेला विजयही लग्नाचा होता खरतर खानावळीतचं तो ईतकं कमवायचा की सरकारी पगारदारही त्याच्यापुढे काहीच नाही. तरीही त्याला कोणी मुलगी देतं नव्हते.तेव्हा विजयला तिसरी बद्दल सविस्तर कल्पनाच देवून लग्नाला राजी केले.जातीचा नसला तरी कमावता आहे आणि तिचही कल्याण होईल किती दिवस लग्नाशिवाय मुलीला घरात ठेवायचं मुलगी तिच्या घरी आनंदात गेली म्हणजे मनावर कसलच दडपण रहात नाही उगाच बोलणाऱ्यांना जागा नको एकतर बोलणाऱ्याच्या तोंडाला झाकन नसतं. असं सांगून शामकाकांनी सुहास माधवीच मनं वळवून तिसरीचं लग्न विजयशी केले आणि शामकाकांमुळेच सावळ्या तिसरीच आयुष्य उजळले.
सुहास माधवीच्या आयुष्यातुन विजयच्या आयुष्यात तिसरीचा गृहप्रवेश झालाच्या आनंद फक्तनी फक्त शामकाका नी् काकींना झाला.आणि तिसरी एकदाची संसाराला लागली.कोणाच आयुष्य कधी उजेळ काही सांगता येत नाही. विजयचा नकार असतानाही तिसरी खानावळीत विजया मदत करायला सरसावले दोघाच्याही मदतीने खानावळीला जणू भरभराटीच आली तिसरीचा पायगुण विजयला लकी ठरला आणि बघता बघता एका खानावळीच रूपांतर रेस्टॉरंटमध्ये आणि त्यानंतर काही दिवसांनी एका हॉटेलमध्ये कधी झाले काही कळलेचं नाही.त्या हॉटेल उदघाटन शामकाका व काकींनी जरी केले तरी त्या हॉटेलला आपल्या आईवडीलांच नाव सुहास माधवी अर्थात 'हॉटेल सुमा' असचं ठेवलं बघाना ज्या तिसरीला आईवडीलांनी काळीसावळी म्हणून हिणवल तिचा तिरस्कार केला त्या आईवडीलांची ऋणबंधनाची अशाप्रकारे परतफेड केली.जेव्हा हे सर्व सुहास माधवीला कळले तेव्हा त्यांचीच त्यांना लाज वाटत होती
तेव्हा जन्माला येणारे आपत्य कसही असुदेत गोरा गोंमटा काळा सावळा,शेवटी ते आपल्याच काळजाचा एक भाग असतो.मग का म्हणून तिरस्कार कारायचा कशासाठी हिणवायचं. कोणाचं कधी केंव्हा कसे नशीब उजळेल काही सांगता येत नाही म्हणून स्वतःला कधीही मोठ आणि शहाणा समजायच नाही कारण वेळकाळ प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाच उत्तर देत असते.शिवाय आपल बाळ ते आपलंच असतं आणि आपलीच लेकरं आईवडीलांच नाव मोठं करत असतातं काय.
तिसरीला जुळे मुलं झाल्याच कळल्यावर शामकाका व काकींना खुप आनंद झाला ते क्षणाचाही विलंब नकरता तिच्या मुलांच्या बारशाला गेलेत. आणि शामकाकांनी आपल्या नातवंडांच बारसे धामधूम केले.
