akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

थंड प्रेमी

थंड प्रेमी

3 mins
285


कधी कधी मनात उत्कंठा येते तुला भेटण्याची...

डोळे भरून तुला पाहण्याची ....

घालमेल सुरू असते तुझ्या भेटीसाठी...

तुझ्या विविध छटा नी घायाळ होते मन तुझ्या साठी....

तु समोर आलास की पाहात राहु असे वाटते ....

थंडच तु चांगला दिसतो राग आल्यावर मात्र विरघळून जातो..

पण तु कसा ही असलास तरी मला फार आवडतोस...

नाही माहित मला की माझ्या प्रेमाची जाणीव आहे तुला का...???

मनवाने म्हणजे मनू ने लिहिलेल्या त्या ओळी वाचून मोहन म्हणजे मनवा चा पती चक्रावला मनू काहीतरी किचन मध्ये करत होती सहज मोहन ने ड्रॉवर उघडले आणि त्याला एक कागद सापडला मनू कविता वैगेरे करायची हे त्याला माहित होते म्हूणन त्याने सहज वाचली आणि त्याचे चेहऱ्याचे हावभाव बदले कारण ती एक प्रेम कविता होती तो वाचून विचार करू लागला "माझ्यासाठी असती तर भेटीसाठी घालमेल का असती आणि प्रेमाची जाणीव "असंख्य प्रश्न मोहन च्या डोक्यात घुमू लागले कारण तो मनापासून मनू वर प्रेम करायचा आणि तीही मग हे काय मोहन अस्वस्थ झाला काय करावे त्याला समजेना झाले विचारायचे कसे हा हि प्रश्न उभा होता तेव्हड्यात त्याला मनु ने हाक मारली त्याने ड्रॉवर मध्ये कागद ठेऊन तो किचन कडे वळला तर मनू त्याच्या आवडीचे अळू वडे करत होती त्याला पाहत ती म्हणाली "घे ना टेस्ट कर कसे झाले ते सांग "मोहन गोधंळला होता त्याला असे पाहून "काय झालं मोहन असा काय पाहतोस "?

"काही नाही "म्हणत मोहन बाहेर गेला त्याचे असे अळू वडे न खाता बाहेर जाणे मनू ला आवडले नाही काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आले तिने गॅस बंद केला आणि बाहेर आली तर मोहन गॅलरी बसलेला त्याच्या शेजारी जाऊन ती बसली त्याला पाहून तिने म्हण्टले "काय झालं अळू वडे टेस्ट न करताच आलास "

"मला नको "

पण का "

"कशाला दिखावा करतेस माझ्यावर प्रेम नाही तर " 

"तू हे काय बोलतोस "

"खरं तेच बोलतो "

"म्हणजे "

"तू कोणाच्या भेटी साठी आतुर आहेस ना आणि त्याला प्रेमाची जाणीव असेल कि नाही "

"हे तू काय बोलतोस "

"मग तू कोणासाठी एव्हडी प्रेम कविता लिहीलीस "

मनू च्या लक्षात सगळं प्रकार आला तिने हसत हसत त्याला पाहत म्हटले "तू ड्रॉवर मधला कागद पाहिलास ना अरे वेड्या मी काल टीव्ही पाहत बसलेली असताना आईस क्रीम ची जाहिरात पहिली आणि मला त्या ओळी सुचल्या त्या वाचल्या तर असेच वाटेल कि हि प्रेम कविता आहे पण कोणासाठी हे कुठे माहित आहे अरे शेवटची लाईन उरलेली तेव्हड्यात बेल वाजली मग काय तसाच कागद ड्रॉवर मध्ये गेला तुला माहित आहे कि मी किती प्रेमवेडी आहे थंड आईस क्रीम खाण्यासाठी आणि तू पण कधी कधी म्हणत असतोस ना कि आईस क्रीम वर प्रेम करायचं होतास माझ्यावर का केलं एव्हडं त्याच्यासमोर मला भाव नाही देत तर अरे शेवटची वाक्य अशी होती "पण आईस क्रीम तुझ्यावर वेडी प्रेम करणारी मी आहे बरं का "

हे ऐकताच मोहन हि जरा शांत झाला त्याला आपण उगीचच मनू वर संशय घेतला म्हणून वाईट वाटले तो काही बोलायच्या आत मनू ने त्याला" जे झालं ते विसर अशी कविता आईस क्रीम वर करणारी मीच असेन त्यामुळे जो हुआ वो भूल जाओ "

मोहन हि हसत हसत उठला आणि म्हणाला "चल ह्या साठी माझ्याकडुन तुला आईस क्रीम ची ट्रीट "

"अरे पण मी त्याच्यासमोर तुला विसरेन ना "

"चालेल मला तुच्या आनंदासाठी मी काहीही करेन आणि तो थंड असें पर्यंत रौब दाखवेल मग काय वितळून जाईल ना मग मीच आहे ना तुच्यासाठी प्रेमवेडा "


Rate this content
Log in