STORYMIRROR

Chaitrali Vasgaonkar

Others

3  

Chaitrali Vasgaonkar

Others

स्त्री

स्त्री

1 min
9

प्रिय स्त्री ,

तु तुझ्या माणसांवर जितक प्रेम करतेस ना,

तितकच प्रेम स्वतः वर सुद्धा कर.

तु तुझ्या कुटुंबाची जशी आवड निवड जपतेस ना,

तशीच स्वतः ची सुद्धा जप.

आरशात पाहताना स्वतःला च सांग ,

हो,मी खूप सुंदर आहे.

तु मुक्तपणे ह्या जगात वावरायला शिक,

तु ह्या जगात स्वतः ची ओळख निर्माण कर.

तु आहेस च प्रेमळ पण त्या प्रेमाला दुबळेपणा ची झळ नको.

तु कुटुंबासाठी जशी जगतेस ना ,

तशीच स्वतः साठी सुद्धा जग.

नाती सांभाळून कुटुंब जपणारी तू ,

नोकरी सांभाळून घर जपणारी तू,

प्रत्येक पिढीला आदर्श देणारी तू.

किती झटशील ग दुसऱ्या साठी,

थोड थांबून विचार कर ना.

मान्य,आहे तुझ्या वर च जबाबदारी,

पण थोड स्वतः ला सुद्धा जप ना.

 शक्ती शिवाय भक्ती सुद्धा अपूर्ण आहे.


Rate this content
Log in