गाव
गाव
1 min
2
शहर विचारत चहा घेणार का?
पण गाव जेवल्या शिवाय सोडत नाही.
ऐकलंय त्याने शहरात खूप मोठं घर घेतलय !
पण मुलांना आंगण दाखवायला गावकडेचं घेऊन जातो.
विषय पोटापाण्याचा असतो म्हणून शरीर
शहरात राहतं. नाहीतर हे वेड मन गावातचं रमत.
आपल्या गावात जी आपूलकि आहे, ति ह्या शहरात न्हाय गड्या.
शहरे कितीहि अपडेट झाली तरी गावाकडची मज्जा वेगळीच आसते. गावाकडे गेलं की शहाराकडे येणारे रस्ते नको वाटतात.
शहरात १ BHK , 2 BHK , 3 BHK आहे पण त्यांना गावाकडच्या भिंतीनची सर नाही .
गावाकडची हिरवळ ओढ लावते.
निवांत शांतता आणि तणावमुक्त आयुष्य गावाकडे च जगायला मिळतं.
म्हणून म्हणतात ना गड्या आपला गावं च बरा.
