अलंकार
अलंकार
1 min
23
प्रत्येक स्त्री चा आवडीचा विषय!
अलंकार हा एक अलंकार नसून तो तिच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे.
तिच्या साठी अलंकार म्हणजे जपणूकीचा ठेवा आहे.
स्त्री आणि अलंकार यांच एक खास नातचं आहे !
अलंकार शिवाय स्त्री अपूर्ण आहे.
प्रत्येक स्त्री ही सुंदर च असते,अलंकारमुळे तिच्या सौंदर्यात अजून च भर पडते.
अलंकार हि एक अशी गोष्ट आहे कि त्यावरती फक्त आणि फक्त स्त्री चा हक्क असतो.
स्त्री ला तिच्या जवळच्या व्यक्ति ने जर अलंकार भेट म्हणून दिला तर तिच्या चेहऱ्यावर च हसू अजूनच खुलत .कारण अलंकार सोबत तिच्या जवळच्या व्यक्तिची हि जोड असते.
त्यावेळी तिच्या आनंदाला माप च नसतं आणि ती खूप च सुंदर दिसते.
मग तो अलंकार छोटा असो किंवा मग मोठा तो तिच्या साठी खूप जवळचा आणि महत्वाचा असतो.
