डोळे
डोळे
1 min
11
सगळ्यात सुंदर नातं कोणत असेल तर ते डोळ्यांचं. ते एकाच वेळी उघडझाप करतात,एकाच वेळी रडतात, आणि एकाच वेळी झोपतात.तेही एकमेकांच्या कडे न बघता आयुष्यभर .
आपल्या चेहऱ्या पेक्षा आपले डोळे चं जास्त बोलतात. आपला राग आणि आपला आनंद डोळ्यातून जास्त व्यक्त होतो. डोळ्यांना कधी खोट बोलता येतं नाही. अश्रू आणि हास्य सहसा कधी एकत्र दिसत नाहीत,पण ज्यावेळी दिसतात ना तो आपल्या आयुष्यातील खूप खास क्षण असतो.
डोळ्यांना व्यक्त व्हायला भाषेची गरज नसते.समोरचा माणूस खरं बोलतो कि खोटं हे त्याच्या नजरेतून समजत.
