Suvarnasha Education

Others

3  

Suvarnasha Education

Others

सोनेरी दिवाळी

सोनेरी दिवाळी

2 mins
314


दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा

"लक्ष दिप हे उजळती घरी

दारी शोभते सडा रांगोळी

नवचैतन्य घेऊनी आली दिवाळी"


टिकल्या दगडावर घासून लवंगी फटाके उडवत माझी दिवाळी साजरी व्हायची. आई पिठात सुगंधी तेल घालून उठणे बनवायची त्यानेच मळी काढायची .गोड खायला द्यायची. कपडे नवे आम्हा भावंडांना कधी मिळालेच नाही.फक्त दुसर्यांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर आमची दिवाळी साजरी व्हायची.पण लहानपणी त्यातही खूप मोठा आंनद होता.

 आज परिस्थिती बदलली मी शिक्षिका झाले. तिथून पुढच्या सर्व दिवाळी चा थाट हा न्याराच होता.

नवीन साड्या , ड्रेस,लाईटिंग, गोड फराळ. फटाके. हे सर्व खर्चिक काम आनंदाने सुरूच.

पण अचानक मनात जाणीव झाली .आपले लहाणपणीचे दिवस कसे होते ?आपली दिवाळी कशी होती ?समाजात आजही गरिब ,अनाथ लोक हा सण खरच साजरा करतेत का?

कुठून येणार पैसा ? या जाणिवेने मन विषण्ण झाले. वाटले का हजारांचे फटाके फोडून पर्यावरण र्हास करायचा. फुकटचा नोटांचा धूर काढायचा. त्या बदलेत गरिबांना फराळ वाटावा, नवे कपडे

वाटावेत. ज्या समाजात आपण जन्मा आलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. त्याची आपण वेळेला परतफेड केलीच पाहिजे. हेच सांगणे मी समाजातील श्रीमंत लोकांना सांगू इच्छिते. तुम्ही या दिवाळीत दुसर्याच्या घरात दिप लावा. परमेश्वर तुमचे घर प्रकाशाने उजळील. मी माझ्या शाळेत हा उपक्रम दोन वर्षे घेतला फटाके न वाजवण्याची मुलांनी शपथ घेतली व ते पैसे शाळेत जमा केले. त्या पैशामध्ये स्वतः चे पैसे घालून आम्ही अनाथाश्रमात फळे व दिवाळीचा फराळ वाटप केले. त्या लेकरांना भेटलो. त्यांच्यात मिसळलो. किती आनंदली होती ती मुलं. पुन्हा पुन्हा सांगता होती ताई तुम्ही परत या आम्हाला भेटायला. नक्की या. खरंतर डोळे भरून आले तिथून जाताना. पण एक वेगळंच समाधान मिळाले . दिवाळीपुर्वीच माझ्या शाळेतील मुलांनी आणि मी एक सोनेरी दिवाळी साजरी केली होती.

समाजाला आपली गरज आहे. म्हणून तुम्ही पण आपला खारीचा वाटा उचलावा.


" आली दिवाळी आरास अंगणी

दिनदुबळ्यांनसाठी गोड फराळ

नवी कपडे देऊ या आज

बंद करा हो फटाक्यांचा जाळ"

 

आपल्यामुळे जर कोणाचे चेहरे आनंदाने उजळणार असतील तर माझ्या साठी हीच माझी सोनेरी दिवाळी आहे. हे क्षण आयुष्यातील सोनेरे क्षण आहेत.

चला तर मग सगळे मिळून साजरी करूया सोनेरी दिवाळी .


Rate this content
Log in