संत जनाबाई
संत जनाबाई
गाता विठोबाची कीर्ती । महापातके जळती ।।१।।
सर्व सुखाचा आगर। उभा असे विटेवर ।।२।।
आठविता पाय त्याचे । मग तू ह्या भय कैंचे।।३।।
काया वाचा मनें भाव। जनी म्हणे गावादेव ।।४।।
विठ्ठलाची निस्सिम भक्त असलेल्या संत जनाबाई यांचा जन्म हा १२९८ काळातील असल्याचे सांगितले जाते. जनाबाईंचे गाव परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावर चे गंगाखेड .वडिलांचे नाव दामा आणि आईचे नाव करूंड. वडील विठ्ठलाचे भक्त आई देखील भगवत भक्त असल्याने लहानपणापासून जनाबाई वर परमात्मा विषयी त्याच्या भक्ती विशेष गोडी निर्माण झाली. संत कवयित्री म्हणून महाराष्ट्राच्या मनात जनाबाईचे अभंग, ओव्या कोरले गेले आहेत. आजही ग्रामीण भागातील महिला जात्यावर दळण दळताना जनाबाईंच्या ओव्या गुणगुणताना आपल्याला दिसून येतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना काम करण्याकरता या नामदेवांच्या वडिलांकडे पाठविले.तेथेच विठ्ठलाच्या भक्तीचे वेड जनाबाईंच्या लागली आणि देवभक्त स्वभावामुळे त्या लवकरच नामदेवांच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्या. नामयाची दासी असे स्वताला म्हणून घेत असताना त्यांना आनंद व्हायचा संत नामदेवांच्या घरात वावरताना तर यांचे विश्व तरी काय होते ? अंगण, तुळशीवृंदावन शेण, गौर्या ,व्यवसायाची जागा, कोठार, माजघर या शब्दांचा उल्लेख म्हणून आपल्याला दिसतो .रोज घडणाऱ्या गोष्टी मध्ये तिला परमेश्वर दिसतो, भेटतो. यातच
प्रत्येक गोष्टी भगवान दिसावा एवढी तिचे मनाचे चक्षु विशाल झालेले आपल्याला दिसतात. हा निर्विकार भाव जनाबाईंचे व्यक्तिमत्व किती उंचीवर नेऊन ठेवतो.संत नामदेव हे विठ्ठल भक्त असल्यामुळे जनाबाई नाही विठ्ठलाचे भक्तीत विशेष गोडी निर्माण झाली .कोणतेही काम करत असताना त्या परमेश्वराच्या नावात दंग राहत असत .काम करताना त्यां मात्र एवढ्या तल्लीन होऊन जात असत की ते कार्य त्यांच्याकरता देवांचे कार्यवाही होत असे. तर या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन जात असत की प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना कामा करू लागी.
झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी
या अभंगांमधून ते समजते
जनाबाई च्या नावावर असलेले जवळ ३४० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात समाविष्ट झाले आहे संत एकनाथ महाराजांचे नातू महा कवी मुक्तेश्वर यांना जनाबाईंच्या थालीपाक आणि द्रौपदी स्वयंवर या अभंगामुळे स्फूर्ती मिळाली होती. बालक्रीडा, प्रल्हाद चरित्र, कृष्णजन्म, थाली पाक या विषयावर जनाबाईंचे अभंग आपल्याला दिसतात. हरिश्चंद्र खान व्याख्याने रचना सुद्धा केली आहेत.
संत जनाबाई ना आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या होत्या. सर्व विसरून त्या विठ्ठल चरणी लीन झाल्या होत्या. हे त्यांचे काव्य वाचल्यानंतर लक्षात येते. जनाबाईंच्या काव्यामध्ये त्यागी वृत्ती, सहनशीलता, वात्सल्य ,कोमलता, त्यांची दयाळू वृत्ती,, समर्पणाची वृत्ती स्त्रीच्या उत्कटपणे भावना, दिसून येतात. त्यांची भाषा ही सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशीच होती .हृदयाचा ठाव घेत गेली.
विठु माझा लेकुरवाळा।
संगे गोपाळांचा मेळा।।
हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंच्या आहे
जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे .
हे परमेश्वरा तू माझे सर्वस्व आहेस मित्र सोबती आहेस.
तूच कृष्ण, तूच विठ्ठल।
तूच विष्णू सारी रूपे
एकच आहे ।तूच माझे सर्वस्व आहे।।
माझे लक्ष तुझ्या। दर्शना कडे लागले आहे।।. असे त्या म्हणत. आपल्या अभंगात आई व बाळाचे नाते यांचे त्या वर्णन करतात. आईचे आपल्या बाळावर अतोनातप्रेम असते. ती कितीही कामात असले तरी सतत मन काळजी करत असते .विठ्ठल आपली माऊली आहे. ती सदैव आपल्या भक्तांची काळजी घेते .सजीवातील पशुपक्षी मानव हे पण तसेच आहे. कितीही कामात असले तरी आपल्या बाळाकडे लक्ष असतेच.
जनाबाईंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी अर्थात चराचरात विठ्ठल दिसत होता. विठ्ठल हाच तिचा श्वास तोच ध्यास होता. अशा प्रकारे संपूर्ण जगच विठूमय झालेले आहे असे संत जनाबाई मानतात .
अभंग लेखन आणि वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीतील योगदानामुळे लवकरच जनाबाईंना संत म्हणून मान्यता मिळाली . डॉ.दा.बा. भिंगार करांनी जनाबाईंची ४३अप्रकाशित अभंग व १० ओव्या संकलित केल्या आहेत. जनाबाईंचे अभंगांमधून आर्त भावभक्ती ,विठ्ठल महिमा, नाम महात्म्य,पंढरी महात्म्य, संत गौरव ,उपदेश असे विषय आलेली दिसतात.जनाबाईंची कविता भाव काव्य ,चरित्र आख्यान, उपदेश,भारुड ओवी ,पाळणा ,आरती अशा अनेक काव्य प्रकारात आढळते.
इ.स.१३५० मध्ये संत जनाबाई ने पंढरपूर येथे समाधी घेतली. आजही खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या तोंडातून जनाबाईंचे अभंग ओव्या गवळणी ऐकायला मिळतात.
ये गं ते गं विठाबाई।
माझे पंढरीचे आई।।
असे भक्तीपूर्ण अभंग रचणारी संत कवयित्री जनाबाई ह्या इतिहासात खूप महान होऊन गेलेल्या आहेत.
तर यांचे अभंग आजही ओठी आपोआप येतात.
