श्रावण महिन्यात शाळेत राबविलेले उपक्रम
श्रावण महिन्यात शाळेत राबविलेले उपक्रम
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील कोणत्या वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे .या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
श्रावण महिन्यातला सण नागपंचमी या दिवशी नागाची पूजा करण्याचे परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे.
नागपंचमीचा सण आमच्या छोट्या एकशिक्षकी शाळेमध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने साजरा केला. कारण कोविड मुळे शाळा बंद आहेत .पण शिक्षण सुरू आहे. आणि येणारे प्रत्येक सण ,दिनविशेष यांचे उपक्रम हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. नाग पंचमीच्या सणाचे निमित्ताने आमच्या छान,गोड मुलींनी सुंदर साड्या नेसून, हाताला मेहंदी काढून त्याचे फोटो मला पाठवले. तसेच दारामध्ये झोका बांधून मस्त झोक्यावर झोका घेत असणारे व्हिडीओ ही मला पाठवले. त्यानंतर मुलांनी पतंग उडवत असलेले फोटो पाठवले. अशा रीतीने आम्ही ऑनलाइन पद्धतीने नागपंचमी हा सण आमच्या शाळेमध्ये साजरा केला . या उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व मुलांना मी ई प्रमाणपत्र स्वतः तयार केलेले व्हाट्सअप वर पाठवले .त्यामुळे मुलं आनंदी झाले व इतर उपक्रमांमध्ये भाग घेण्याची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. तसेच शाळा जरी बंद असली तरी शाळेच्या प्रवाहापासून माझी मुली लांब नाहीत ती मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने शाळेत प्रवाहात शिक्षण घेत आहेत.
त्याच्या नंतर दुसरा सण आला तो रक्षाबंधन /नारळी पौर्णिमा . या सनाला आमच्या मुलींनी सुंदर राख्या स्वतः घरांमध्ये तयार केल्या आणि त्याचे फोटो व मला व्हाट्सअप वर पाठवले. नारळी पौर्णिमा हा सण हिंदू मध्ये श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी समुद्रकिनारी रहाणारे लोक वरून देवते प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. त्यादिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातील समुद्राशी निगडीत असलेले इतर लोक समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात .या दिवशी बहिण भावाच्या हातात राखी बांधते. त्यावरून या पौर्णिमेला राखीपौर्णिमा असे म्हणतात. आमच्या शाळेतील मुले यात मागे कशी राहतील?यामध्ये ही आमच्या छोट्या चिमुकल्या मुलींनी आपल्या बंधू राजाच्या हातामध्ये छान राखी बांधली. आणि राखी बांधून त्याला ओवाळले .गोड खाऊन भरवला.या ऑनलाईन रक्षाबंधन कार्यक्रमाचे , सुंदर फोटो व व्हिडिओ मला पाठवले .त्यानंतर आज वृक्ष संवर्धन काळाची गरज बनलेली आहे .झाडे लावणे त्यानंतर त्याची निगा राखणे जोपासणे, वाढ करणे गरजेचे आहे आणि याचे महत्त्व माझ्या मुलांना समजावून सांगितले. त्यामुळे माझ्या मुलींनी झाडालाही छान राख्या तयार करून त्या झाडांनाही बांधल्या.ओवाळले. आणि सर्वांना हा संदेश दिला की " झाडे लावा झाडे जगवा ." हा उपक्रम आम्ही ऑनलाइन पद्धतीने आमच्या शाळेमध्ये साजरा केला. तसेच त्याबद्दल या उपक्रमाबद्दल मी स्वतः व्हाट्सअप वर मुलींना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र पाठवले त्यामुळे मुली आणखीन उत्साहित झाल्या .आता त्यानंतर श्रावण महिन्यातील पुढच्या सण आहे तो श्रीकृष्ण जयंती म्हणजे कृष्णजन्माष्टमी. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. कारण या दिवशी कृष्णाचा जन्म झाला या दिवशी उपवास करतात व कृष्णजन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.आमच्या भोसले वस्ती शाळेमधील मुलांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंदर भजन गायले व त्या भजनाचे व्हिडिओ मला पाठवले खूप गोड आवाजात दोन्ही मुली माहेश्वरी व वृंदा राजे भोसले या मुलींनी हे भजन गायले होते .तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी कृष्णाची वेशभूषा करून मला फोटो पाठवले मुलीही छान पैकी राधाच्या वेषभुषा मध्ये नटून-थटून मला त्याचे फोटो सेंड केले आता ऑनलाईन पद्धतीने शाळा बंद असली तरी आमच्या शाळेमध्ये सर्व सण-समारंभ दिनविशेष यानुसार जयंती पुण्यतिथी वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक उपक्रम आम्ही ऑनलाइन पद्धतीने घेतच आहोत. आणि त्याबद्दल मुलांना ई प्रमाणपत्राचे लगेचच वाटप केले जाते. मी स्वतः प्रत्येक सणाचे सुंदर असे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते व्हिडीओ माझ्या "सुवर्णआशा " या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहेत. कृष्ण जन्माष्टमी दिवशी कृष्ण जन्माष्टमीला शाळेमध्ये आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला मागील दोन वर्षांपूर्वी .खूप उत्साहाने मुले गोविंदा होऊन नाचत होती. आणि कृष्णाने छान दहीहंडी फोडली मुली राधा बनून आलेल्या होत्या .खूप छान त्यांचे फोटो काढून त्याचा एक व्हिडिओ युट्युब ला मी अपलोड केला आहे.
आता येणाऱ्या पिठोरी अमावस्या हा श्रावणातला शेवटचा सण त्यालाच पोळा से म्हटलं जातं असं शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे .या दिवशी बैलांचा थाट असतो त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही. या दिवशी आपला बैल सगळ्यात जास्त उठून दिसावा म्हणून शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांसाठी शृंगार खरेदी करतो. पोळ्याच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम बैलांची पूजा करून बैलांना सजवून पुरणपोळीचं खाऊ घालतात. या दिवशी आमच्या शाळेमधील मुले मातीचे बैल तयार करून त्यांना छान रंग देतात हा उपक्रम आम्ही ऑनलाईन पद्धतीने साजरा करतो.
हे श्रावण महिन्यात येणारे सण आमच्या १७ पट असलेल्या एकशिक्षकी जि.प.शाळा- भोसलेवस्ती येथे सुंदर रितीने पध्दतीने साजरे केले जातात. आणि आता शाळा बंद असल्यामुळे मुले त्यांच्या घरी हे ऑनलाइन पद्धतीने सण साजरे करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ मला व्हाट्सअप वर पाठवतात. याकामी मला पालकांचे ही खूप मोठे सहकार्य लाभले आहे .त्यांचे ही मनापासून मी आभार मानते त्यामुळे माझे शाळेमधील उपक्रम खूप खूप चांगल्या रीतीने उठावदार, आकर्षक ,आणि सुंदर होतात.
