Rajani Bhagwat

Others

5  

Rajani Bhagwat

Others

साईड मिरर (अलक)

साईड मिरर (अलक)

2 mins
562


आजची सकाळ तिच्यासाठी मळभ घेऊन उगवली एक आभाळात तर दुसरे तिच्या मनात.मनातल्या विचरचक्राला ब्रेक लावत तिने दिनक्रम सुरू केला. मुलाच्या शाळेची,डब्याची तयारी करून तिने त्याला उठवले .नेहमीप्रमाणे त्याच्या मागेपुढे करून त्याला व्हॅन मध्ये बसवून तिने एक उसासा सोडला.

            स्वतःसाठी एक कडक चहा बनवून जमिनीवरच बैठक मारली आणि नेहमीच्या सवयीने टीव्ही सुरू केला.टीव्ही म्हणजे बऱ्याच वेळा एक निरुपद्रवी सोबत ह्यापालिकडे काहीच नसतो ,मनात आले की चालू नाहीतर बंद पण माणसांचे तसे नाही कळ दाबल्याप्रमाणे यांत्रिकपणे ते सुरूही होत नाहीत किंवा थांबतही नाही.         


चहाचा घोट घेता घेता ती त्याच्यासोबत झालेल्या रात्रीच्या वादाचाच विचार करत होती.त्या विचारात आज ती बातम्या बघणे,व्हाट्स ऍप मेसेज ना रिप्लाय देने हा तिचा दिनक्रम ही विसरली.मधेच कुकरच्या शिट्टीने तिची तंद्री भंग पावली,आणि तिचे लक्ष घाड्याळाकडे गेले.चला लवकर आवरून बँकेत वेळेवर जायला हवे आज जर त्याने सांगितलेल कामे झाली नाही तर .....हा विचार इथेच थांबवून ती कामाला लागली.सर्व कामे आटोपून बरोबर नऊ च्या ठोक्याला तिने तिची दुचाकी सुरू केली.        


दुचाकी चालवताना वाऱ्याबरोबर विचार ही तिच्या मनात उमटत होते.काहीही झाले तरी गाडी मात्र ती योग्य वेगाने चालवत असे ,पण अचानक एक गाडी तिच्या जवळून खूप वेगाने निघून गेली आणि क्षणभर तिचे नियंत्रण हलले.तिने गाडी कडेला थांबविली व तिच्या लक्षात आले की आज तिने गाडी सुरू करताना साईड मिरर ऍडजस्ट केलेच नाही.         


अचानक तिच्या मनात एक विचार तरळून गेला,साईड मिरर हे किती महत्वाचे आहेत पाठीमागून येणाऱ्या गाड्या त्यांच्यामुळे आपण बघू शकतो व आपली दिशा आणि वेग ठरवू शकतो ,परंतु हे सर्व आपल्याला एका क्षणात करायचे असते कारण आपण पूर्ण वेळ साईड मिररमध्ये बघून गाडी नाही चालवू शकत आपल्याला समोर बघून मार्गक्रमण करणे ही तेवढेच आवश्यक असते. तसेच जर आपण आपल्या मनाचे साईड मिरर ऍडजस्ट केले तर जीवनाची गाडी कशी सुसाट धावू लागेल.तिच्या ह्या साक्षत्कारामुळे तिच्या मनातले मळभ दूर झाले आणि काय आशचर्य त्या दाटून आलेल्या आभाळातून उन्हाचा एक कवडसा तिच्या चेहऱ्यावर स्थिरावला आणि झाकोळलेली तिची सकाळ प्रसन्न करून गेला.


Rate this content
Log in