काहूर मनी सांजवेळी (अलक)
काहूर मनी सांजवेळी (अलक)


हल्ली याच वागणं खूपच विचित्र झालय . एवढ कसलं काम करतोय सतत फोनवर. वर्क फ्रॉम होम म्हणजे काय वाटल याला सारखच बेडरूममध्ये कैद समोर तो लैपटॉप अन् कानाशी फोन. काही बोलायला जाव तर नेहमी यांच विडिओ कॉन्फरन्स किवा टीमसोबत ऑनलाईन मिंटीग. खूप झाल आता संध्याकाळचे सात वाजून गेले आजतर शनिवार पण आहे तरीही हा ऑनलाईन अन मी इथे बीनलाईन.
उलटसुलट विचारांच अन प्रश्नांच काहूर तिच्या डोक्यात सुरु होत. समोर टीव्ही नुसताच सुरु होता आणि हीचाआवडीचा कार्यक्रम असूनही तीच लक्ष नव्हंत. तेवढ्यात फोन वाजला आणि कॉलर नेम बघून भुवया ताणल्या गेल्या. ह्याची स्टायलिश मैत्रीण अन मला का फोन करतेय? तिने नाखुशीने फोन उचलला आणि संभाषण सुरु केलं. फोन झाल्यावर परत हि चे विचार सुरु झाले. एवढं कसलं महत्वाच काम आहे की त्याचा फोन लागला नाही म्हणून हीने मला फोन केला.
इथे मला द्यायला वेळ नाही पण हिच्याशी काहीतरी गुलुगुलु सुरु असंत सारख विचारायला गेल तर बोलतो तिचा काहितरी प्राब्लेम आहे नंतर सांगेन. अरे पण हिचा प्राब्लेम त्याचा त्रास तुला का तर बोलतो कसा,"मैत्री आहे एवढ्या वर्षांची कराव लागत गं." अत्यंत निरागस चेहरा करुन तो हे बोलतो मग हिला काहीच बोलता येत नाही. हीची खूप चिडचिड होते.
उद्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे हे तरी लक्षात आहे का त्याच्या ती मनातल्या मनात तडफडत होती. टीव्ही बंद करून ती स्वयंपाक घरात गेली अन् स्वयंपाकाला लागली. रात्री जेवण वैगेर आवरुन बेडरुम मध्ये गेल्यावर बघते तर काय हा चक्क झोपलेला. ती पुन्हा एकदा हिरमुसली, अन् विचारांच काहूर डोक्यात घेऊनच झोपी गेली.
रात्री बारा वाजता त्यांच्या घराची बेल वाजली पण हा ढीम्म हलला नाही. ती रागाने याला बडबडतच उठली कोण आलं असेल ह्या विचारात दरवाजा उघडायला गेली. दार उघडताच काय आश्चर्य त्याची मैत्रिणी. हि खर तर खूप चिडली होती पण नॉर्मली होत तीने तिला घरात घेतल, तिच्या हातातले केकचे पार्सल बघून हिच्या कपाळावरच्या आठ्या गेल्या अन् तिला थोडस आश्चर्यच वाटून गेल.
बेडरूममधून बाहेर येत त्याने तिला विश केलं. तिला खूप गहिवरून आलं. मैत्रिणीच्या साक्षीने त्यांनी केक कापला अन् एकमेकांना भरवला. "बाकी सगळं मी गेल्यावर करा हं" असं बोलून हसतहसत मैत्रिणी निघून गेली. ती निघून गेल्यावर हिने सर्वप्रथम त्याच्या मिठीत शिरत त्याची माफी मागितली. तिला त्याचं प्रेम बघून खूप गहिवरुन आलं होतं, तिच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसत त्याने त्याची मिठी अधिकच घट्ट केली.
खूप छान सुखद आश्चर्याचा धक्का दिला तू मला आणि मी, तिला थांबवत तो बोलला "मॅडम खरं सरप्राईज तर आता आहे." तिला डोळे बंद करायला सांगून तो आत गेला अन् एक मोठा बॉक्स घेऊन आला. हे गिफ्ट माझ्याकडून खास माझ्या प्रियेसाठी. मोठ्या प्रेमाने त्याने तो बॉक्स दिला आणि एखाद्या लहान मुलीसारख ती तो बॉक्स उघडू लागली. तो प्रेमळ आणि कौतुकभरल्या नजरेने तिच्याकडे बघत होता. बॉक्स उघताच आत दहा छोटे छोटे गिफ्ट रॅप वस्तू होत्या. हे बघून तिचे डोळे विस्फारले गेले आणि मोठे आणि रेखीव डोळे अजूनच मोठे दिसू लागले. तिच्या डोळयांत बघून तो बोलला दहा वर्ष झाले ना तर दहा छोटेसे गिफ्ट माझ्याकडून, आवडलं का माझं सरप्राईज.
हो खूप आवडलं मला खरंतर माझ्याकडे शब्दच नाहीत व्यक्त व्हायला म्हणत तिने त्याच्या गालावर किस केलं व त्याच्या मिठीत शिरुन आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी केली.