vishwanath/विश्वनाथ shirdhonkar/शिरढोणकर

Children Stories

4  

vishwanath/विश्वनाथ shirdhonkar/शिरढोणकर

Children Stories

रेनबोथ!

रेनबोथ!

8 mins
379


-शाळा सुटली .वर्गात सगळ्यांनी आपआपली दप्तर सांभाळले आणि बाहेर धावले . दिन्या (दिनकर ), गण्या (गणपत), राजू (राजेंद्र ), हऱ्या (हरी) दिघ्या (दिगंबर) पण घाईघाईने बाहेर आले . सगळे सातवीत असले तरी यात राजू थोडा मोठा होता .

-"काय आज परत चलायचं का ? " राजूने विचारले .सर्वांनी आपल्या माना वळवून होकार दिला .  

-"लय मजा येतो ? " आता हे राजूने विचारले की सांगितले हे कोणाला समजले नाही पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं .

-"हो ना ? त्या गोऱ्यापान सुंदर मुली फ्राक घालून काय खेळतात ना , मला तर जाम भारी वाटतं . " हऱ्या म्हणाला .

-"ठाऊक आहे तू काय बघतो ते . " गण्या म्हणाला .

-"मग तू पण तर तेच बघतो जे मी बघतो " हऱ्याने मागार घेतली नव्हती .

- "बरं चला लवकर " राजू म्हणाला तसे सर्व घाईघाईने चालू लागले .

-संध्याकाळचे पाच अजून वाजले ले नव्हते . हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर जाऊन थबकले . चारी बाजूने बाउंड्रीवाल होती पण ती जास्त उंच नव्हती .एका झाडाचा आडोसा घेत बाउंड्रीवालच्या फटीतून आतलं थोडं फार दिसत होतं .

-आत एक टेनिस कोर्ट देखील होतं . चार मुली टेनिस खेळत होत्या . त्यांचाच खेळ पाहण्यासाठी ही बच्चे कंपनी रोज शाळा सुटल्यावर थोड्यावेळ इथं थांबत असे . आज देखील ते सर्व खेळ पाहण्यात गुंग होते. पण आजचा दिवस काही वेगळाच होता . थोड्या वेळातच एक शिपाई आला . 

-" काय चाललय रे . " तो जोराने ओरडला . तसे सगळे घाबरले . त्यांनी वळून बघितले शिपायाच्या खांद्यावर बंदूक होती . सगळ्यांची बोबडी वळली . सर्व गप्प .

-" मी काय विचारतोय ? काय चाललय इथे ? " त्याने पुन्हा विचारले .

- " काही नाही जी . " आता राजू बोलला , " आम्ही घरी जात होतो . "

" मग थांबला का ? "

" जातच होतो जी . " गण्या म्हणाला .

-" आता असं नाही जाता येणार कोणाला . "

-सगळे घाबरले .

" जी चुकलं आमचं .आता नाही येणार ." राजू म्हणाला .

- " तरी नाही जाता येणार . " शिपाई म्हणाला , चला सर्व आत साहेबांसमोर . साहेब बोलावून राहिले . आज पकडले गेला . आता साहेब माहित नाही काय शिक्षा देतील . "

- सर्व गप्पच .

-" चला म्हणतो ना . " शिपाई थोडा जोराने बोलला तसे सर्व त्याच्या मागोमाग आत शिरले .

-आत लानमध्ये इंग्रज जिल्हाधिकारी रेनबोथ चहा पीत बसले होते . शिपाई या सर्वाना त्यांच्यासमोर घेऊन गेला आणि अदबीने उभा राहिला व म्हणाला ," जी ही पोरं आली जी . "

- " जा तू . " जिल्हाधिकारी म्हणाले तसं शिपाई पुन्हा गेटवर गेला .

- " काय रे पोरांनो रोज काय बघता इथं ? "

-" काही नाही जी ... " राजू  म्हणाला . सर्व पोरं घाबरलेली होती .

-" मग रोज घरी जाताना इथं का थांबता ? "

-सर्व पोरं गप्प च . कोणी काहीच बोललं नाही .

-“तुम्हाला हा खेळ आवडतो ?”            

“ जी ... “ राजू म्हणाला .                   

“ बरं मग सांगा बघू या खेळाचे नाव काय?        

जी मला ठाऊक आहे .....

”आता हरया मध्ये च बोलला , “ या खेळास्नी मैदानी खेळ म्हणतात .”          

आता जिल्हाधिकारी हसले .                

राजू म्हणाला , “ ए हरया गप्प बस ."            

"बरं अगोदर मला सर्वांचे नाव सांगा बघू .” जिल्हाधिकारी म्हणाले .       

जिल्हाधिकाऱ्यांच्या हसण्याने पोरांची भीती आता थोडी कमी झाली होती . 

पटापट सर्वांनी आपले नाव सांगितले .                                                 

“बरं मला आता हे सांगा की कोणत्या शाळेत शिकता सर्व आणि कोणकोणत्या इयत्तेत आहात ?” जिल्हाधिकाऱ्यांनी विचारले .                     

जी , आम्ही सर्व इयत्ता सातवीत आहोत आणि शासकीय माध्यमिक शाळेत जातो . “ राजू म्हणाला .                                                             

“ बरं का पोरांनो या खेळाला ‘ टेनिस ‘ असं म्हणतात . माझ्यासोबत या . आजपासून आतमध्ये येऊन खेळ बघायचा . बाहेरून असं चोरून बघायचं नाही . “ जिल्हाधिकारी रेनबोथ म्हणाले तसं सर्वांना फार आश्चर्य झाले  .मग सर्व पोरं जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत टेनिस कोर्टवर गेले . दिन्या , गण्या , हरया , दिघ्या , आणि राजू , सर्व आश्चर्याने मुलींना टेनिस खेळताना बघत होते . --थोड्यावेळ खेळ बघितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोरांना विचारले , “ घरी नाही जायचं का आता ? कुठे राहता तुम्ही सर्व ? “                                         

 “ जी स्टेशन जवळच्या झोपडपट्टीत राहतो “राजू म्हणाला .            

“ असं का ? “ जिल्हाधिकारी म्हणाले , “ तसं थोडं लांबच आहे पण जास्त लांब नाही . बरं मला सांगा तुम्हाला काय-काय खेळ खेळायला आवडतात ? राजू तू सांग . “     

जी आम्ही विटीदांडू खेळतो , गोट्या खेळतो . पण रोज नाही खेळतं जी . आणि जास्त काही खेळतही नाही . सकाळी च आमचे आई बाबा कामावर निघून जातात . आम्हाला घरचेही बघावं लागतं . कसेबसे अकरा वाजता शाळेत येतो . आमच्याजवळ पैसे नाही , जागा नाही , आणि घरी कुणालाही वेळच नसतो आमच्यासाठी . “   – “ मग गृहपाठ करता की नाही ?"             

सगळे पोरं गप्पच होते .                     –“हे चांगलं नाही . गृहपाठ तर करायलाच हवा .”      –“ जी आम्ही झोपडपट्टीत राहतो . आमच्याकडे जागाच नाही बसायला .” राजू म्हणाला ,” आमचे बाबा रोज मजुरी करतात . नुसती शाळेची फी भरतानाच नेहमी त्रास  होतो . “                              - -तुम्ही थोड्यावेळ खेळ बघा , मी आलो . जाऊ नका कोणी .”           

जिल्हाधिकारी रेनबोथ बंगल्याच्या आत गेले . थोड्याच वेळात शिपाई या पोरांच्या जवळ आला आणि म्हणाला , “ चला , साहेबांनी बोलाविले आहे . “           -सर्व पोरं शिपाया बरोबर गेटवर आले . शिपाई म्हणाला , “ चला बसा सर्व जीपमध्ये मागे .” तसं सर्व पोरं घाबरले , “ का ? कुठे जायचं ?”राजूने विचारले .        - शिपाई थट्टेने म्हणाला , “ आता तुमची काही खैर नाही , आता जाणार तुरुंगात सगळे . रोज चोरून मुलींचा खेळ बघता होय ? चला बसा . “               

सर्व पोरं घाबरत घाबरत बसले . थोड्या वेळाने जिल्हाधिकारी रेनबोथ आले त्यांच्यासोबत एक आणखीन शिपाई होता . तो पोरांच्या सोबत मागे बसला . जिल्हाधिकार्यांनी स्वत: जीप सुरु केली आणि हे सर्व बंगल्याच्या बाहेर पडले . जीप सरळ झंडाचौकच्या एका गजबलेल्या मार्गावर विजय स्पोर्ट्स नावाच्या खेळाच्या दुकानावर च येऊन थांबली . इंग्रज कलेक्टर रेनबोथला आपल्या दुकानावर बघून दुकानीचा मालक घाबरला . घाबरत घाबरत त्याने विचारले ,“ जी काय सेवा करू ?”  – काही नाही या पोरांना रोजच्या खेळण्याचे सर्व सामान दाखवा .” मग राजूला म्हणाले , “ सर्व नीट बघून घ्या आणि जे जे हवे ते सर्व घ्या . “              

--पोरांची एकच धांदल उडाली . त्यांना समजेचना की हे काय होत आहे . त्यांच्या सोबतचा शिपाई त्यांची मदत करू लागला . अनेक खेळ पोरांनी कधी बघितलेले च नव्हते . सापशिढी , व्यापार , लुडो , क्यारमबोर्ड आणि त्याच्या गोट्या व स्ट्राईकर , दोन रिंग , बेडमिंटनसाठी नेट आणि चार रेकेट , क्रिकेटचे सर्व सामान आणि दोन बेट व सहा चेंडू , दोन फुटबॉल , टेबलटेनिससाठी चार बेट आणि सहा बॉल . इतकं सगळं सामान गोळा झालं . जिल्हाधिकार्यांनी ते सर्व सामान जीपमध्ये ठेवायला सांगितले . नंतर दुकानाच्या मालकाला म्हणाले ,“ याचे बिल माझ्या नावाने बनवा .” त्यांनी पूर्ण पैसे दिले .    -- हे सर्व करून जिल्हाधिकारी रेनबोथ सर्व पोरांना घेऊन माध्यमिक शाळेच्या मागे आदिवासी मुलांसाठी असलेल्या एका वसतीग्रहात आले . कलेक्टर रेनबोथ आले म्हणून तिथं एकच गोंधळ उडाला . वसतीग्रह तसे नुकतेच नवे बनले होते आणि अद्याप सुरू व्हायचे होते . त्यांनी तिथल्या एका माणसाला पाठवून आदिवासी विभागाच्या एका अधिकाऱ्याला तिथं बोलावून घेतले . वसती ग्रहातली एक खोली खोलवून सर्व सामान तिथं ठेवविलं आणि अधिकाऱ्याला म्हणाले , “ उद्या एक ठराव तयार करून पाठवा . जो पर्यंत हे वसतीग्रह पूर्णपणे सुरु होत नाही तो पर्यंत ही खोली या पोरांसाठी राखीव ठेवण्यात येईल . इथं तुम्ही कुलूप लावा आणि या सर्व सामानची जवाबदारी तुमची .” इतकं सांगून जिल्हाधिकारी रेनबोथ यांनी सर्व सामान त्यांच्या सुपूर्द केलं .इतकं करून जिल्हाधिकारी रेनबोथ आपल्या बंगल्यावर परतले . नंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगून पोरांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केली .                            -दुसऱ्या दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत गण्या राजूला म्हणाला , “ राजू , त्या खेळाच्या सामानाला तर साहेबांनी खोलीतच ठेवून दिलं . ? “               

--राजू म्हणाला , “ हौ की , मला बी नाही काही समजलं . ते साहेब त्या खेळाच्या सामानाचे काय करतील ?”      --बघू या . पण आज तर आपण बंगल्याच्या आत जाऊन खेळ बघू शकतो की . “ हरया म्हणाला . त्याच्या इतकं म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले .         -मधली सुट्टी संपली . सर्व आपल्या वर्गात जाऊन बसले . – अचानक सातवीच्या वर्गात कुजबुज सुरु झाली ती कलेक्टर रेनबो च्या शाळेत येण्याची . शाळेचे प्राचार्य धावत-धावत त्यांच्या स्वागतार्थ गेलेले वर्गातल्या खिडकीतून पोरांनी बघितले आणि काही वेळातच प्राचार्यांना त्यांच्या कक्षात कलेक्टर रेनबोथ सोबत जाताना देखील वर्गातल्या पोरांनी खिडकीतून बघितले होते . आणि थोड्याच वेळात शाळेचा शिपाई वर्गात दाखल झाला , “ दिन्या (दिनकर ), गण्या (गणपत ), राजू (राजेंद्र ), हऱ्या (हरी) दिघ्या (दिगंबर) यांना प्राचार्यांनी त्याच्या कक्षेत लगेच बोलाविले आहे . “ हे सांगून परत गेला .                         –हे पाच पांडव घाबरत घाबरत प्राचार्यांच्या कक्षेत गेले . तेथे कलेक्टर रेनबोथ देखील बसलेले होते . यांना बघताच म्हणाले , “ हौय , हीच ती पोरं . “          

--प्राचार्य म्हणाले , “ जा रे पोरांनो तुम्ही वर्गात बसा . “              

--तेव्हढ्यात कलेक्टर रेनबोथ म्हणाले , “ नाही नाही तुम्ही थांबा . तुमच्यासाठी तर हे सर्व आहेच . मी काय म्हणतो सर , तुम्ही तुमच्या खेळ टीचरला बोलवा . मी त्यांना सर्व सोपविणार आहे . “                        --लगेच पोरांसाठी खेळ बघणारे स्पोर्ट टीचर आले . “ जी सर ..... “          

--“ हे बघा ....... “ कलेक्टर रेनबोथ स्पोर्ट टीचरला म्हणाले , “ या पोरांसाठी आणि इतर गरीब व गरजू मुलांसाठी तुमच्या शाळेच्या शेजारी असलेल्या आदिवासी मुलांच्या वसतीग्रहात आम्ही एक खोली यांच्या सर्व खेळाला लागणाऱ्या सामानासाठी राखीव ठेवत आहोत . आजपासून तुम्ही या सर्वांचे प्रभारी . पोरांसोबत तेथे जाऊन कुलूप लाऊन किल्ली स्वत:च्या ताब्यात घ्या . आजपासून रोज संध्याकाळी दोन तास तुम्ही तिथं द्यायला हवे . हे दोन तास पोरं तिथं कोणताही खेळ खेळू शकतात . सर्व सामानाची नोंदणी करून ठेवा आणि व्यवस्थितपणे सर्व लेखी स्वरुपात रिकार्ड ठेवा .             

 –मग राजूला म्हणाले , “ तुझं काय नाव राजू , तू सर्व पोरांमध्ये थोडा मोठा आहे . तू आज पासून सर्व पोरांना सोबत घेऊन चालायचं . आणि काही लागलं तर आपल्या स्पोर्ट टीचरला सांगायचे . महत्वपूर्ण म्हणजे तू – एक अभिनव असा ‘ क्लब ‘ म्हणजे बाल समाज मंडळ स्थापित करण्याचा प्रयत्न करायचा .त्यात सर्व व्यवस्था तुम्हा सर्व पोरांचीच असेल . थोडे दिवस लागतील तुम्हाला सर्व शिकायला पण जमेल सर्व . तुमचे स्पोर्ट टीचर तुम्हाला मार्गदर्शन देतील . आणि काही लागलच तर माझ्या बंगल्यावर तुम्ही पोरं संध्याकाळी येऊ  शकता .”                        

--या नंतर कलेक्टर रेनबोथ उठले . त्यांनी ५०१/-रुपये प्राचार्यांना दिले , “ हे माझ्याकडून . या पोरांना काही लागले तर यातून द्या . म्हणजे या पोरांसाठी वह्या , पुस्तकं , वगैरे . आपल्याला चांगले नागरिक तयार करावाय चे आहे . आणि चांगले खेळाडू देखील . “   

– शाळेच्या गेटवर , प्राचार्य , स्पोर्ट टीचर आणि पोरं इंग्रज कलेक्टर रेनबोथला नुसतं बाहेर निघताना बघत होते . 

---------------  

समाप्त 

-----'


Rate this content
Log in